नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कोयता, चॉपर व तलवार घेऊन सत्यावर फिरणाऱ्या दोन जणांना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Nashik City Crime Branch Unit 2) पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, पथकाने शस्त्रे पुरविणाऱ्यांसही ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून दोन कोयते जप्त केले. पथकाने (Squad) तिघांच्या ताब्यातून तीन कोयते, एक चॉपर व तलवार एकूण दोन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रोहित मताजी लगरे (वय २२, रा. उंटवाडी, खेतवाणी लॉन्स, झोपडपट्टी, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार परिमंडळ दोन हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा हवालदार मनोहर शिंदे यांना शनिवारी (दि. १५) खेतवानी लॉन्स, उंटवाडी येथे एक युवक व त्याच्यासोबत विधी संघर्षित हातात कोयता, चॉपर व तलबार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. ही बाब त्यांनी प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांना सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला, पथकाने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी तळेगाव अंजनेरी येथील एका विधीसंघर्षित बालकाकडून हत्यार (Weapon) घेतल्याची माहिती दिली.
दरम्यान, पथकाने दोघांच्या ताब्यातून एक चॉपर, तलवार व कोयता जप्त केला. कोयते व शखे पुरवणारा विधीसंघर्षित बालकाकडून दोन कोयते जप्त केले. हवालदार मनोहर शिंदे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी, सहायक उपनिरीक्षकशंकर काळे, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, हवालदार संजय सानप, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, प्रविण बानखेडे यांनी कारवाई (Action) केली.