नाशिक | भारत पगारे | Nashik
शहरातील (City) टवाळखोरांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने (Commissioner Office) कठोर भूमिका घेऊन कारवाईस धार दिली आहे. गेल्या दीड वर्षांत पोलिसांनी तब्बल ४२ हजार संशयित अर्थात गुन्हेगार व टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (VijayKumar Chavan) मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव यांनी संबंधित ‘प्रभारी’ निरीक्षकांना सूचित केले आहे. त्याअन्वये, शहरातील १३ पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीत डिसेंबर २०२३ ते २० मे २०२५ पर्यंत ४२,५५४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर आयुक्तालयाने संशयितांची (Suspected) यादी तयार केली आहे. आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या संशयितांसह विविध गुन्ह्यात सहभागी झालेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईलाही (Action) सुरुवात करण्यात आली आहे.
सातत्य ठेवणारे रडारवर
सातत्याने टवाळखोरी करणाऱ्यांसह विविध गुन्ह्यांतील संशयितांविरुद्ध मोक्का, तडीपारी, एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित होणार आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांची पथके टवाळखोरांना हेरत असली तरी बऱ्याच ठिकाणी छुप्या पद्धतीने गैरप्रकार सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांच्या व्हॉटस्अॅप हेल्पलाईनवर संबंधितांची ठिकाणे कळवण्याचे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.