Saturday, November 23, 2024
Homeनगरचोरीच्या उदेशाने विज रोहित्र फोडले; 90 हजाराचे नुकसान

चोरीच्या उदेशाने विज रोहित्र फोडले; 90 हजाराचे नुकसान

नेवासा | तालुका प्रतिनिधी

ऑइल व तांब्याची तार चोरण्याचे उदेशाने अज्ञात चोरट्यांनी नेवासा तालुक्यातील फत्तेपुर शिवारातील विज रोहित्र फोडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबद महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राहुल वाल्मीक मराठे (वय 31 वर्ष) यांनी शनिशिंगणापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी महावितरण कंपनीकडे चांदा कक्ष येथे सहाय्यक अभियंता म्हणून काम पाहतो. पादा काम चांदा,कौठा, फत्तेपुर, महालक्ष्मीहिवरा, माका, लोहारवाडी अशी गावे येतात. फतेपुर गावासाठी बाह्यश्रत कर्मचारी म्हणुन अमोल दहातोंडे हे काम करतो.

- Advertisement -

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दि. 22/09/2023 रोजी सकाळी 10:45 वाजेचे सुमारास मी सोनई येथे असताना मला फत्तेपुर येथून आमचे कंपनीचा बाह्यश्रोत कर्मचारी अमोल दहातोंडे यांनी माझे मोबाईल फोन करून सांगितले की फत्तेपुर गावचे शिवारातील सौ. संगिता रामनाथ महाडीक यांचे शेत गट नंबर 76 मधील शेतामध्ये असलेला कैलास सोपान कोलते व इतर 07 नावाचा 63 KVA विज रोहित्र (ट्रान्सफार्मर) रात्री कोणीतरी बॉडीची कव्हर प्लेट ओपन करून तो पोलवरून जमीनीवर पाडुन दिला आहे. त्यामुळे रोहित्राची बॉडी तुटुन त्यातील ऑईल जमिनीवर सांडलेले दिसत आहे असे कलविले. त्यावरून मी प्रमोद रामनाथ महाडीक, बाबुराव इंगळे, कैलास कोलते व इतर शेतक-यांनी घटना ठिकाणी जावून पाहिले असता दि.21/9/2023 रोजी रात्री ते दि. 22/01/2021 रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने कैलास सोपान कोलते व इतर 7 नावाचा 63 केव्हिए ट्रान्सफार्मरची बॉडीची कव्हर प्लेट ओपन करून ट्रान्सफार्मर पोलवरून जमीनीवर पाडल्यामुळे ट्रान्सफार्मरची बॉडी फुटुन त्यातील 125 लिटर ऑईल जमिनीवर सांडुन महावितरण कंपनीचे अज्ञात व्यक्तीने सुमारे 90 हजार रुपये किमतीचे नुकसान केल्याचे मी व तेथील शेतकयांनी पाहिले आहे. अज्ञात व्यक्तीने महावितरण कंपनीचे नुकसान केले आहे म्हणून माझी त्याचे विरुद्ध फियाद आहे. या फिर्यादिवरुन शनिशिंगणापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या