Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : एक दिवसाच्या बाळाला निर्दयी मातेने ओढ्यात फेकून दिले

धक्कादायक : एक दिवसाच्या बाळाला निर्दयी मातेने ओढ्यात फेकून दिले

पुणे |प्रतिनिधी| Pune

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या एक दिवसाचा बाळाला निर्दयी मातेने ओढ्यात फेकून दिल्याची घटना पुण्यातील सहकारनगर भागात उघडकीस आली आहे. परंतु स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेने या बाळाचे प्राण वाचले आहेत. पोलिसांनी 40 वर्षीय निर्दयी मातेवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आंबील ओढा परिसरात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री लहान बाळाच्या रडण्याच्या आवाजाने स्थानिक नागरिक जागे झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर दत्तवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या बाळाला चिखलातून बाहेर काढले. महिला पोलिसांनी त्याला मायेची ऊब दिली आणि ससून रुग्णालयात दाखल केले.

या घटनेनंतर पोलिसांनी निर्दयी मातेचा शोध सुरू केला. संपूर्ण दत्तवाडी पोलीस स्टेशनची हद्द पिंजून काढली आणि या महिलेचा शोध लावला. अनैतिक संबंधातून जन्मलेले हे बाळ बदनामी टाळण्यासाठी या महिलेने टाकून दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिला अटक केली नसल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या