Tuesday, April 29, 2025
Homeनगरमागितले 'रेशन' मिळाला 'मार'; स्वस्त धान्य दुकानासमोरच 'हाणामारी'

मागितले ‘रेशन’ मिळाला ‘मार’; स्वस्त धान्य दुकानासमोरच ‘हाणामारी’

करंजी | वार्ताहर

मागील महिन्याचे धान्य मागितले म्हणून स्वस्त धान्य दुकानदाराला त्याचा राग आला व कामगारासह त्याच्या भावाने एका व्यक्तीस जबर मारहाण केल्याची फिर्याद पाथर्डी पोलिसात दाखल झाली आहे.

- Advertisement -

पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील स्वस्त धान्य दुकानाचे वाटप सातवड येथील बाबासाहेब पाठक यांच्याकडे आहे. देवराईचे नागरिक सातवडला जाऊन तिथून आपल्या हक्काच स्वस्त धान्य घेऊन येतात.

देवराईचे अनिल शिवराम पालवे वय (वर्षे ४९) हे शुक्रवार दि २२ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता स्वस्त धान्य दुकानदाराकडे धान्य आणण्यासाठी गेले असता त्यांना चालू महिन्याचे धान्य देण्यात आले. त्यानंतर पालवे यांनी मागील महिन्याचे धान्य आम्हाला मिळालेले नाही ते देखील देण्याची मागणी दुकान चालकाकडे केली. त्याचा राग येऊन महेश दत्तात्रय पाठक व त्याचा भाऊ ऋषिकेश पाठक यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद पालवे यांनी पोलिसात दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....