Saturday, October 10, 2026
HomeनाशिकCrime News : धक्कदायक! महिलेच्या घरात १९ तलवारींसह सापडले ११ चाकू; पोलिसांची...

Crime News : धक्कदायक! महिलेच्या घरात १९ तलवारींसह सापडले ११ चाकू; पोलिसांची धडक कारवाई

चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisgaon

शहरातील धुळे रोड (Dhule Road) येथे राहणार्‍या एका महिलेच्या घरातून पोलिसांनी (Police) १९ तलवारी व ११ चाकूसह लहान-मोठे हत्यारे जप्त केले आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा शहरात आणला गेला आणि तो पोलिसांच्या नजरेत कसा? पडला नाही असा प्रश्‍न उपस्थित होते आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज (बुधवारी) चाळीसगाव पोलिसांनी (Chalisagaon Police) गुप्त माहितीच्या आधारे धुळे रोड येथील नवनाथ नगर येथे राहणार्‍या एका महिलेच्या घरावर छापा टाकला असता त्याठिकाणाहून पोलिसांच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला. यात १९ तलावरी लहान-मोठे ११ चाकू जप्त करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरात प्रथम एका महिलेच्या घरात इतका मोठा शस्त्रसाठा सापडल्यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या असून हा शस्त्रसाठा विक्रीसाठी आणला होता का? दंगल घडविण्यासाठी असे अनेक प्रश्‍न उपस्थित होते आहे.

दरम्यान, पोलिसांच्या (Police) चौकशीत महिलेच्या भावाने हा शस्त्रसाठा आणला होता आणि तो मोहरमच्या पुजेसाठी आणल्याचे संबंधित महिलेने चौकशीत माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत असून, चाळीसगाव पोलीस स्टेशनला (Chalisagon Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ताज्या बातम्या

MP Rajabhau Waje : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत नाशिकच्या नेतृत्वाचा ठसा; खासदार...

0
नाशिक | Nashik संयुक्त राष्ट्रांच्या ८१ व्या आमसभेत (UNGA 2026) भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेले नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांचा ५...