Saturday, September 14, 2024
Homeनगरबाभळेश्वर येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी जोरबंद; कोयता, लोखंडी रॉड आणि चाकू जप्त

बाभळेश्वर येथे दरोड्याच्या तयारीतील टोळी जोरबंद; कोयता, लोखंडी रॉड आणि चाकू जप्त

बाभळेश्वर | वार्ताहर

- Advertisement -

राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे लोहगाव फाट्याजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी दोघांना पकडण्यात लोणी पोलिसांना यश आले असून तिघेजण मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.या टोळीवर बीडसह इतर जिल्ह्यात दरोड्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपींमध्ये प्रवरानगरचे दोन तर लोहगावच्या एकाचा समावेश आहे.

रविवार दि.१३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी लोणी पोलीस गस्तीवर असताना त्यांना बाभळेश्वर येथील प्रवरा डेअरी जवळच्या दत्त मंदिराच्या मागे संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी नियोजनबद्धपणे आरोपींना घेरले.अंधार असल्याने दोघे जण पकडण्यात पोलिसांना यश आले तर तिघेजण मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.लोखंडी कोयते आणि रॉड ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली.

अविनाश भास्कर धाडे (वय २४ वर्ष), नितीन जाणू भिंगारदिवे (वय २६ वर्ष) दोघेही रा. पंचवटी, प्रवरानगर ता. राहाता यांना पोलिसांनी जागीच जेरबंद केले. स्वप्निल वरखडे (पूर्ण नाव माहित नाही) रा. लोहगाव ता.राहाता व इतर दोन साथीदार नाव पत्ता माहीत नाही. गु.र.नं. ४७१/२३ भादवि कलम ३९९,४०२, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे   पो.हे.कॉ. साळवी यांच्या फिर्याद वरुन दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि युवराज आठरे, उपनिरीक्षक योगेश शिंदे, उपनिरीक्षक घोडे, पो.हे.कॉ. साळवी, पो.ना. सय्यद, सहा.फौजदार सांगळे , हे.कॉ.आव्हाड,नऱ्हे,फटांगरे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या