Saturday, July 27, 2024
Homeनगरसंगमनेरात 400 किलो गोवंश मांस जप्त

संगमनेरात 400 किलो गोवंश मांस जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेरात (Sangamner) गोवंश जनावरांची कत्तल (Slaughter of Cattle) करुन त्यांचे मांस घेवून जाणारी पिकअप जीप हे वाहन मुद्देमालासह संगमनेर शहर पोलिसांनी (Sangamner Police) पकडले आहे. गोवंश जनावरांचे मांस वाहतूक करणार्‍याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात (Sangamner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सलमान बाबाजी सय्यद (रा. आंबी खालसा ता. संगमनेर, हल्ली राहणार रहेमतनगर, संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. सलमान सय्यद हा त्याच्या ताब्यातील पिक अप जीप वाहन क्रमांक एम. एच. 17 बी. वाय 8580 मधून गोवंश जनावरांचे कत्तल केलेले मांस (Meat) घेवून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सदर वाहन मौलाना आझाद मंगल कार्यालयामागे पकडले. त्यामध्ये 80 हजार रुपये किमतीचे 400 किलो गोवंश जनावरांचे मांस आढळून आले. पोलिसांनी गोवंश जनावारांचे कत्तल (Slaughter of Cattle) केलेले मांस व वाहन असा 3 लाख, 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याबाबत पोलीस शिपाई काशिनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सलमान सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 723/2022 भारतीय दंड संहिता कलम 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारीत 1995 चे कलम 5 (अ), 5 (क), 9 (अ) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या