Tuesday, May 21, 2024
Homeनगरअडीच लाखांच्या फ्लॉवरची परस्पर विक्री करून अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा

अडीच लाखांच्या फ्लॉवरची परस्पर विक्री करून अपहार, दोघांविरुद्ध गुन्हा

तळेगाव दिघे (वार्ताहर)

संगमनेर तालुक्यातील मनोली येथून टेम्पोत भरून पाठविलेला 2 लाख 49 हजार 689 रुपये किंमतीचा फ्लॉवर गाजीपूर मार्केट (दिल्ली) येथे न पोहचविता परस्पर विक्री करून अपहार करण्यात आला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील मनोली येथून दि. 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता फ्लॉवर भाजीपाला टेम्पोत (क्रमांक एच आर 73 बी 7549) भरून गाजीपूर मार्केट (दिल्ली) येथे पाठविण्यात आला होता. मात्र फ्लॉवर गाजीपूर मार्केटला न पोहचविता 2 लाख 49 हजार 689 रुपये किमतीच्या फ्लॉवरची परस्पर विक्री करून अपहार करण्यात आला.

याप्रकरणी अबू बकर अब्दुल इनामदार (वर 31, रा. समनापूर ता. संगमनेर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अडीच लाख रुपयांच्या फ्लॉवरची परस्पर विक्री करून अपहार केल्याच्या आरोपावरून आरोपी अझरुद्दीन फकरु खान (रा. रूपडाका ता. हतीन जि. पलवल, हरिराणा) व हर्षद (पूर्ण नाव माहित नाही, रा. चिला ता. तावडु जि. नुहु, हरिराणा) या दोघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंदविण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या ‘मार्गदर्शनाखाली साहायक फौजदार लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या