Tuesday, September 17, 2024
Homeनगरशेअर मार्केटच्या नावाखाली पावणे तीन कोटींचा गंडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शेअर मार्केटच्या नावाखाली पावणे तीन कोटींचा गंडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शेवगाव । तालुका प्रतिनिधी

- Advertisement -

तालुक्यात गाजत असलेल्या व राज्याचे लक्ष वेधलेल्या शेअर मार्केट घोटाळ्यातील दोन कोटी पंच्चाहत्तर लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा लावुन जेरबंद केले आहे.

बबन शिरसाठ (रा.नविन खामपिंप्री ता.शेवगाव) यांच्या फिर्यादीवरुन दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी छत्रपती विघ्ने (रा.आंतरवली बु. ता.शेवगाव ) यास शेवगाव पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहिती वरुन ताब्यात घेतले आहे.

सीडीजी इनव्हेस्टमेंट नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग नावाचे ॲाफिस विघ्ने याने आंतरवली खुर्द ता.शेवगाव येथे थाटले होते. या नावाखाली २ कोटी ७५ लाख रुपयांची फिर्यादी शिरसाठ व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केले होते. त्यानुसार फसवणूक व अन्य कलमान्वये दि. १२ ॲागस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा : चोरट्याची हिंमत तर पहा… भरदिवसा घरात घुसून महिलेला लुटले!

गुप्त बातमीदारामार्फत आरोपी शेवगाव येथे येणार असल्याची पक्की खबर पोलीस निरीक्षक नागरे यांनी मिळाली होती. त्यानुसार तयार केलेल्या दोन पथकातील पोलीस आरोपींच्या पाळतीवर होते. आरोपी हा रात्री सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास एका ट्रक मधुन शहरामधील गाडगे महाराज चौक येथे खाली उतरुन ॲटो रिक्षामध्ये पळुन जात असताना त्याचा मोटार सायकलवर पाठलाग करुन विघ्ने यास आखेगाव रोड येथील वरुर चौक येथे ताब्यात घेतले. या आरोपी विरुध्द जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव ठाण्यात संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोसई भास्कर गावंडे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकॉ प्रशांत आंधळे, पोकॉ संपत खेडकर, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ बप्पासाहेब धाकतोडे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली. पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत.

हे ही वाचा : महायुतीत वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचा थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा… कारण काय?

- Advertisment -

ताज्या बातम्या