अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सिगारेटचे पाकीट उधार न दिल्याच्या रागातून एकाने संपूर्ण दुकान पेटवल्याची (Shop Fire) घटना नगर तालुक्यातील नांदगाव (Nandgav) येथे घडली. या प्रकरणी शनेश्वर किराणा व जनरल स्टोअर्सचे मालक शिवाजी भगवान सोनवणे (वय 41, रा. नांदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय दादा जाधव (रा. नांदगाव) याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 मार्च रोजी अडीच वाजता ही घटना घडली. रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित जाधव याने सिगारेटचे पाकीट उधार मागितले होते. सोनवणे यांनी त्याला सिगारेटचे पॉकिट (Cigarette Pocket) उधार न दिल्यामुळे त्याचा राग येऊन संशयित जाधव याने दुकानाचे शटर कशाच्या तरी साहाय्याने थोडे वर करून दुकानात पेट्रोल टाकले व आग लावली. यात दुकानातील किराण मालाचे व फर्निचरचे सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान (Loss) झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोसई भालेराव करत आहेत.