Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमविद्यार्थ्यावर दांडके, पाईपने हल्ला

विद्यार्थ्यावर दांडके, पाईपने हल्ला

मोबाईल चाार्जिंगवरून एमआयडीसीत घडली घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मोबाईल चार्जिंगच्या कारणावरून विद्यार्थ्याला लाकडी दांडके, लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी (1 डिसेंबर) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीतील सम्राट चौकातील एन. एम. कोटींग कंपनीसमोर घडली. आकाश बाळू त्रिंबके (वय 20 रा. नेप्ती, ता. नगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.

- Advertisement -

याप्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणार्‍या तिघांविरूध्द सोमवारी (2 डिसेंबर) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम आप्पा नर्‍हे, ओम आप्पा नर्‍हे (दोघे रा. नर्‍हे मळा, बोल्हेगाव, अहिल्यानगर), आर्यन विजय धलपे (रा. चेतना कॉलनी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी व संशयित आरोपी असे सर्वजण रविवारी रात्री एमआयडीसीतील एन. एम. कोटींग कंपनी समोर शेकोटी करून शेकत असताना प्रेम नर्‍हे फिर्यादीला म्हणाला माझा मोबाईल तुझ्याकडील पॉवर बँकला चार्जिंगला लाव.

तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाले, माझ्या मोबाईलची बॅटरी कमी असून तो मी चार्जिंगला लावला आहे तुझा मोबाईल मी आत्ता लावणार नाही, असे म्हणताच प्रेमसह तिघांना फिर्यादीचा राग आला. त्यांनी लाकडी दांडके, लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चव्हाण करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पेठ रोडवर एमडी विक्रीचा प्रयत्न फसला; दोघांना...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati पेठ रोडवरील (Peth Road) म्हसरूळ परिसरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अमली पदार्थविरोधी पथकाने (Anti-Narcotics...