Saturday, May 25, 2024
Homeनगरवृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळला

वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळला

अहमदनगर (प्रतिनिधी)

आजारी अवस्थेत मिळून आलेल्या महादेव पतंगे (वय 55, पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांना उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांची माहिती पोलिसांना मिळाली नसून पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. त्यांचे नाव महादेव पतंगे आहे, त्यांचे वर्णन चेहरा उभट, रंग गोरा, उंची पाच फूट सहा इंच, अंगाने सडपातळ, अंगात पांढर्‍या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, दाढी काळी पांढरी, गळ्यात माळ, असे आहे. या मयत इसमाच्या नातेवाईकांबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अधिकारी पोलीस अंमलदार गंगावणे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या