Saturday, March 29, 2025
Homeक्राईमBribe Crime News : शिक्षणातील सर्वाधिक लाचखोरी धुळ्यात; दहा गुन्ह्यांत महिला, पुरुष...

Bribe Crime News : शिक्षणातील सर्वाधिक लाचखोरी धुळ्यात; दहा गुन्ह्यांत महिला, पुरुष अधिकारी जाळ्यात

चेकने घेतले ७५ हजार रुपये

नाशिक | भारत पगारे | Nashik

शिक्षण विभाग व संलग्न कार्यालयातील भ्रष्टाचार व लाचखोरीची विविध प्रकरणे धुळे जिल्ह्यात (Dhule District) सर्वाधिक आढळून आली आहेत. सन २०२० ते फेब्रुवारी २०२५ या पाच वर्षांत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) परिक्षेत्रात रचलेल्या ३७ सापळ्यांपैकी सर्वाधिक दहा लाचखोरीची प्रकरणे धुळे जिल्ह्यातून उघड झाली आहे. त्याखालोखाल जळगाव, नंदूरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा नंबर आहे. विशेष म्हणजे सर्वच ३७ प्रकरणांत अनेक पदांवर कार्यरत महिला संशयितांचा सहभाग जास्तीचा आढळला आहे. विशेष म्हणजे बहुतांश लाचप्रकरणे शालेय स्तरावरील कामकाजासंबंधी आहेत, हे अधोरेखित झाले आहे.

- Advertisement -

शासकीय, निशासकीय व तत्सम कार्यालयांत (Office) तक्रारदारांना आपली विविध कामे करवून घेण्यासह अडकलेली प्रकरणे ‘पास’ करुन घेण्यासाठी संबंधित कार्यालयातील लोकसेवकाच्या मागणीनुसार लाच देण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचे कारवायांतून समोर आले आहे. असे असतांना काही सापळ्यांत अतिशय क्षुल्लक कामांच्या बदल्यात संशयित लाचखोरांनी अगदी सातशे रुपयांपासून ते तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंच लाच स्वीकारली आणि मागणी केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे एकूण सापळ्यांतील संशयितांचे वय पाहता ते सर्वसाधारणः ३६ ते ५७ वयोगटातील आढळून आले आहे. अनेक संशयित अटकेत (Arrested) असून काही जामिनावर बाहेर आहेत. तर, प्रत्येक गुन्ह्यात (Case) एक किंवा तीन पेक्षा अधिक संशयिताचा (Suspectd) सहभाग आढळून आला आहे.

या पदांवर होते कार्यरत

सर्व संशयितांपैकी अनेक वर्ग एक ते वर्ग चारचे अधिकारी, कर्मचारी व शिपाई म्हणून कार्यरत होते. तर, लाच घेणाऱ्यांत शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, भांडारपाल, प्रभारी प्राचार्य, मुख्याध्यापिका, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ लिपिक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रामविकास अधिकारी, वरिष्ठ सहायक, अधिक्षक (वेतन पथक), उपशिक्षिका, प्राथमिक शिक्षक, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी या पदांवर कार्यरत असणाऱ्या संशयितांचा समावेश होता. यातील अनेक निलंबित असून काहींची विभागीय चौकशी सुरु आहे. काहींच्या निलंबनाचे प्रस्ताव ‘रेडी’ असून संबंधित विभागप्रमुखांकडून कार्यवाही सुरु असल्याचे कळते.

९ लाख ५३ हजार रुपये जप्त

या ३७ सापळ्यांत लाचेची एकूण रक्कम ९ लाख ५३ हजार १५० रुपये आहे. एसीबीने ही रक्कम हस्तगत केली असून तीन सापळा प्रकरणांत लाचेची मागणी करण्यात आल्याचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, जास्त रकमेची लाच घेणाऱ्यांसह इतरांच्या घरांची झडती देखिल घेण्यात आली असून त्यात सोने, दागिने, मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. एका प्रकरणात संशयिताने धनादेशामार्फत ७५ हजारांची लाच स्वीकारल्याचे समोर आले आहे.

गुन्हे नोंद असलेल्या संशयितांची नावे (कंसात पोलीस ठाणे)

मिलिंद जगन्नाथ घाटकर (त्र्यंबकेश्वर), भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (भद्रकाली), विलाय चिमाजी कुसाळकर (कोपरगाव), ज्ञानेश्वर काशिनाथ बाचकर (राहुरी), संगीता वसंतराव शिंपी (धुळे शहर), निकहत नसरीन अ. लतिफ (देवपूर), बापूसाहेब बाळासाहेब हरिश्चंद्रे, भारती बापूसाहेब इथापे (श्रीरामपूर), असद युसूफखान पठाण (तोफखाना), गुलाब नथ्थु पिंजारी (साक्री), जयश्री हरिश्चंद्र पाटील (पश्चिम देवपूर), सिकंदर सायबू तडवी (यावल), योगेश अशोक खोडपे (जळगाव), राहुल प्रकाश मोराणकर (मालेगाव कँम्प), चंद्रा चंद्रकांत ढवळे (कोतवाली), सुकेंद्र किसनराव वळवी (देवपूर), भानुदास हिरामण माळी, हाफिजखान हनीफखान पठाण (सोनगीर), काश गोविंदा निकवाडे (( निकवाडे ((नंदूरबार), अशोकदामू बिऱ्हाडे, तुळशीराम भावलाल सौंदाणे (धरणगाव), सुनीता सुभाष धनगर, नितीन अनिल जोशी (सरकारवाडा, नाशिक), संजय रामदास पाटील (येवला), दिगंबर अर्जुन साळवे (नाशिकरोड), राकेश दिनकर साळुंखे, विजय गोरख पाटील (धुळे), नंदलाल शांताराम शिनकर (नवापूर), विनोद साकरलाल पांचोली (नवापूर), विजय गुलाबराव पाटील (अंमळनेर), विनोद शंकर जाधव, नरेंद्र उत्तम वाघ, विजय पंढरीनाथ महाजन (एरंडोल), सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा, दिनेशकुमार जमनाप्रसाद पांडे (सातपूर), सुनील वसंत पाटील, बाळू हिरामण निकम (सिन्नर), संगिता नंदलाल पवार (श्रीरामपूर), प्रदीप पुंडलिक परदेशी (धुळे तालुका), मिनाक्षी भाऊराव गिरी (धुळे शहर), महेंद्र गोपाळराव सोनवणे (धुळे शहर), सतिष सुरेश चौधरी (नंदूरबार), नरेंद्र राजेंद्र इंद्रजित, रोशन भिमराव पाटील (उपनगर), संदीप प्रभाकर महाजन (कासोदा), गौतम बालूप्रसाद मिसर (पारोळा)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : द्राक्षबागेत पकडला बिबट्या; वनविभागाचे दोन कर्मचारी जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) शिंदवड येथे काल (शुक्रवारी) द्राक्ष बागेत मुक्त संचार करणारा बिबट्या (Leopard) जेरबंद करण्यात आला. मात्र,...