अहमदनगर | प्रतिनिधी
तिघांनी पायी चालत असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाला (tractor driver) ओ मामू अशी हाक मारत थांबवून बळजबरीने रोख रक्कम, मोबाईल असा 45 हजार रूपयांचा ऐवज लुटला.
संतोष प्रकाश धनवडे (वय 35 रा. बाभळगाव ता. कर्जत) असे लुट झालेल्या चालकाचे नाव आहे. धनवडे रविवारी रात्री पावणे अकरा वाजता माळीवाडा बस स्थानकाकडे (Maliwada Bus Stand) पायी चालले असता त्यांना लुटले. त्यांनी मंगळवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Bus Stand) फिर्याद दिली असून पोलिसांनी (Police) दुचाकी (एमएच 16 बीएल 8147) वरील तीन अनोळखी चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा (crime of theft) दाखल केला आहे.
हवालदाराने मागितली दोन हजाराची लाच; ‘लाचलुचपत’नं पकडलं रंगेहात
रविवारी रात्री धनवडे सुखसागर हॉटेलकडून (Sukhsagar Hotel) माळीवाडा बस स्थानकाकडे (Maliwada Bus Stand) पायी जात असताना एलपीजी पेट्रोल पंपाजवळ (LPG Petrol Pump) दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना ओ मामू अशी हाक मारली. धनवडे थांबताच ते तिघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी धनवडे यांच्याकडून बळजबरीने खिशातील रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला व घटनास्थळावरून निघून गेले. धनवडे यांनी झालेला प्रकार मंगळवारी रात्री पोलिसांना सांगितला. पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहे.