Friday, November 15, 2024
Homeनगरएकलहरेत दर्गाच्या वॉल कंपाऊंडवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामस्थांमध्ये संताप

एकलहरेत दर्गाच्या वॉल कंपाऊंडवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामस्थांमध्ये संताप

टिळकनगर (वार्ताहर)

श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे अजब चोरीची धक्कादायक घटना घडली असून, एकलहरे-कोल्हार रस्त्यावर नदीच्या कडील शेतात असलेल्या शादवल बाबा दर्गाचे वॉल कंपाउंडसह गेटवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

- Advertisement -

याबाबद येथील जाकीर इलाहीबक्ष शेख ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकलहरे- कोल्हार रस्त्यावर नदीकाठी असलेल्या स्थानिक शेतकऱ्याची शेतजमीनीत हजरत शादवल बाबा यांची दर्गाह आहे. काल रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दर्गाभोवती असलेल्या भिंतीतून वॉल कंपाउंडचे लोखंडचे अँगल उचकून अँगलसह जाळी, गेट सह अन्य लोखंडी वस्तू लंपास केले. सदर वॉल कंपाउंडचे सर्व काम येथील जावेद इलाहीबक्ष शेख यांनी स्वखर्चाने केले होते.

सदर दर्गाह ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असून घडलेल्या घटनेने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तर पोलीस प्रशासनाला याबाबद जाकीर शेख यांनी माहिती दिली असून पोलीस प्रशासनाने सदर घटनेची गंभीर दखल घेऊन चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी तंटामुक्तीचे अध्यक्ष अन्सार शेख, पत्रकार लालमोहमद जहागीरदार, सरपंच पती अनिस शेख सह ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या