Saturday, November 14, 2026
Homeक्राईमCrime News : उमराण्यात दुकानात धाडसी चोरी; नागरिकांच्या मदतीने दोघे ताब्यात

Crime News : उमराण्यात दुकानात धाडसी चोरी; नागरिकांच्या मदतीने दोघे ताब्यात

उमराणे | वार्ताहर | Umarane

येथील मुख्य रस्त्यावरील (Road) एका दुकानात रात्री दहा वाजता धाडसी चोरी झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. कटर आणि ग्राइंडरच्या सहाय्याने दुकान फोडणाऱ्या दोन चोरट्यांना सतर्क नागरिकांच्या (Citizen) मदतीने रंगेहात पकडण्यात आले असून, या घटनेमुळे उमराणे परिसरात तीव्र घबराट पसरली आहे.

- Advertisement -

नेमकी घटना कशी घडली?

वाद वऱ्हाडी गावातील मोहन शिंदे यांचे उमराणे येथील मुख्य रस्त्यावरील सुरज ट्रेडर्सच्या पाठीमागे ‘तन्वी ग्लास ॲल्युमिनियम ॲन्ड स्टील सेंटर’ नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री नऊ वाजता दुकान बंद करून शिंदे आपल्या गावी गेले होते. यावेळी त्यांचा पुतण्या ऋषिकेश शिंदे हा दुकानातच थांबला होता. काही वेळानंतर ऋषिकेश जेवण करण्यासाठी जवळील हॉटेलमध्ये (Hotel) गेला आणि जेवण आटोपून दुकानाकडे परतला. त्यावेळी त्याला दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने तातडीने शटर वर करून पाहिले असता, दोन चोर पिशव्यांमध्ये कटर मशीन, ग्राइंडर मशीन व इतर असा अंदाजे एक ते दीड लाख रुपयांचा ऐवज भरत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

प्रसंगावधान राखून चोरांना ठोकल्या बेड्या

ऋषिकेशने क्षणभरही विलंब न करता बाहेरून शटर खाली ओढून ते बंद केले आणि तातडीने आपल्या मित्रांना व जवळच्या ग्रामस्थांना फोन करून बोलावून घेतले. नागरिक जमा झाल्यानंतर सर्वांनी मिळून शटर उघडून दोन्ही चोरट्यांना शक्कल लढवून जागेवरच पकडले आणि दोरीने बांधून ठेवले. यानंतर तात्काळ ‘११२’ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी केली तात्काळ कारवाई

माहिती मिळताच देवळा तालुका पोलीस स्टेशनचे (Deola Taluka Police Station) पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोहम्मद अबूजर सलीम (वय २०) आणि शेख मोहम्मद शयख जावेद (वय २१, रा. आयेशा नगर, मालेगाव) या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, गस्त वाढवण्याची मागणी

रात्रीचे अवघे दहा वाजले असताना मुख्य रस्त्यावरील दुकानात अशा प्रकारे धाडसी चोरी झाल्यामुळे उमराणे परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरांना कठोर शासन करण्यात यावे आणि उमराणे भागात रात्रीची पोलिसांची गस्त तातडीने वाढवण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

ताज्या बातम्या

कंगना

सोनिया गांधींवरील पोस्ट कंगनाला भोवली! खासदार कंगना रणौतविरोधात गुन्हा दाखल

0
नवी दिल्ली | New Delhiभाजपची खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरिोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोशल मीडियावर गांधी कुटुंबातील सदस्यांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप...