अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
देहरे (ता. नगर) येथील एका महिलेला तिच्या मुलाला मारण्याची व कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देत दोघांनी पळवून नेले. नगर-मनमाड रस्त्यावरील एका हॉटेलवर तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तनवीर शेख, सोहेल शेख, अल्फेज शेख (सर्व रा. देहरे, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, पीडित महिला घरातून मिसिंग झाल्याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस पीडित महिलेचा शोध घेत होते. मिसिंग महिला पोलीस पथकाला अकोले बसस्थानकावर मिळून आली. तिला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता तिने जबाब दिला की, आरोपींनी मुलाला मारण्याची धमकी दिली आणि कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देवून दहा हजार व सोन्याचे दागिने घेतले. आरोपी तन्वीर शेख याने 14 मार्च रोजी सायंकाळी नगर – मनमाड रस्त्यावरील एका हॉटेलवर नेले. तिथे बदनामी करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला. तिच्या जबाबानुसार पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.