Thursday, September 10, 2026
Homeक्राईमCrime News : मंदिरात चोरी करणारे तीन जण जेरबंद

Crime News : मंदिरात चोरी करणारे तीन जण जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दाभाडी शिवारातील (Dabhadi Area) पुरातन श्री रोकडोबा हनुमान मंदिरात दानपेटीतील रोकड लांबवण्यासह शनिदेवाचा चांदीचा मुकुट लंपास करणाऱ्या चोरट्यांचा (Thieves) शोध घेण्यास छावणी पोलिसांना (Police) यश आले आहे. या चोरीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या चोरट्यांनी अॅल्युमिनियम समजत चांदीचा मुकुट भंगार विक्रेत्यास विकल्याचे चौकशीत उघड झाल्याने पोलिसांकडून भंगार विक्रेत्याचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

रोकडोबा हनुमान मंदिरात (Rokdoba Hanuman Temple) ६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दानपेटीतील रोकड लांबवण्यासह शनिदेवाच्या मूर्तींवर असलेला चांदीचा मुकुट लंपास केला होता. या घटनेने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. छावणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलीस निरीक्षक दीपक जाधव, उपनिरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला होता.

मिळालेल्या माहितीवरून भगवान गोमा पिंगळे, भाऊसाहेब सुभाष बोरसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी बाळाभाऊ रघुनाथ पवार (रा. मनमाड) याच्यासोबत ही चोरी केल्याची कबुली देत शनिदेवाचा मुकुट चांदीचा नसल्याचे समजून भंगार विक्रेत्यास विकल्याचे सांगितले. या तिघा चोरट्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, पोलिसांनी मंदिरातील चोरीप्रकरणी कसोशीने तपास करत तिघा चोरट्यांना अटक (Arrested) केल्याबद्दल भाविकांतर्फे दाभाडी ग्रामपंचायत सरपंच प्रमोद निकम यांनी पो.नि. जाधव व उपनिरीक्षक चौधरी यांचा सत्कार करत आभार मानले.

ताज्या बातम्या

राज

“देशाच्या राजधानीचे महत्व संपवण्याचा प्रयत्न सुरु”; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन राज...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राजधानी दिल्लीतून गुजरातमध्ये हलवण्यावरून देशात नवा वाद सुरु झाला आहे. विरोधकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून धारेवर धरले आहे. शिवसेना...