Friday, September 20, 2024
Homeक्राईमCrime News : धक्कादायक! अल्पवयीन मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार; संतप्त पालक रस्त्यावर...

Crime News : धक्कादायक! अल्पवयीन मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार; संतप्त पालक रस्त्यावर उतरले

बदलापूर । Badlapur

- Advertisement -

कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची अमानुष पद्धतीने हत्या केल्याच्या मुद्दयावरुन सध्या देशभरातली वातावरण तापले आहे.

मात्र, मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur school girl sexual abuse) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बदलापूर पूर्वेकडील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. आणखी धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण बदलापूरमध्ये या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हे हि वाचा : आ. अमोल मिटकरींवर कोपरगावात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

ज्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली होती त्या शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच संतप्त पालक तसेच बदलापूरकर जमले असून ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. “आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत” अशी पालकांची भावना असून, त्यांनी शाळा प्रशासनाने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली आहे.

हे हि वाचा : काँग्रेस आमदार थेट अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत; लवकरच पक्षप्रवेश?

दरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर शाळेने आपला माफीनामा सदर केला. तर, शाळेच्या मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, त्या दोन मुलींच्या वर्गशिक्षिका आणि दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. तसेच, आरोपी असलेल्या कंत्राटी सफाई कामगार ज्या कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आला होता त्यांच्यासोबतचा करारही शाळेकडून रद्द करण्यात आला आहे. तसेच, तक्रार करण्यास आलेल्या पालकांना ताटकळत ठेवणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली.

हे हि वाचा : ओढत नेवून मुलीशी गैरवर्तन; कुटुंबाला मारहाण

- Advertisment -

ताज्या बातम्या