येवला | प्रतिनिधी | Yeola
तालुक्यातील कोळम बुद्रुक (Kolam Budruk) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी (Burgalry) करून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत लूट (Theft) केल्याची घटना घडली आहे. बापु भालचंद्र आवारे (वय २७) पत्नी चिञा, मुलगी विद्या असे तिघे घराचे छतावर झोपलेले होते.
तर बापू यांची आई सुनिता व वडील भालचंद्र हे दोघे घराचे पडवीत झोपलेले होते. रविवारी, (दि. ४) रात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात तिघा चोरट्यांनी येवुन भालचंद्र आवारे, सुनिता आवारे व चिञा आवारे यांना मारहाण करुन चाकुचा धाक दाखवुन त्यांचे अंगावरील सुमारे २१ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने काढुन घेतले. तसेच बापू यांचे गळ्याला चाकु लावुन चाकुचा (Knife) धाक दाखवुन घरात ठेवलेले रोख ५० हजार रुपये काढुन घेतले.
सदर घटनेत जखमी झालेल्या भालचंद देवराम आवारे, सुनिता भालचंद आवारे, चित्रा बापु आवारे यांचेवर येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी बापु आवारे यांचे फिर्यादीवरून अज्ञात तिघा चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडी, शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत ७१ हजरांची लूट केल्याप्रकरणी तालुका पोलिसात (Taluka Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक टीम व डॉग स्कॉड यांनी भेट दिली आहे. तर मनमाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन, तालुका पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी भेटी दिल्या आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर हे करत आहेत.