Sunday, September 29, 2024
Homeक्राईमतक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला अन् हत्यारासह पकडला

तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला अन् हत्यारासह पकडला

तोफखाना पोलिसांची कारवाई || तरूणाच्या कारमधून तलवार, सुरा जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेसोबत वाद (Woman Dispute) करून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरूणाच्या कारमध्ये धारदार हत्यारे (Sharp Weapons) मिळून आल्याची घटना शनिवारी (28 सप्टेंबर) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात घडली. रवींद्र उत्तम जाधव (वय 32 रा. निंबळक ता. नगर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार, एक लोखंडी सुरा व कार असा दोन लाख 52 हजाराचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. परि.पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

रवींद्र जाधव व एका महिलेचे वाद (Dispute) झाले होते. ती महिला तक्रार देण्यासाठी शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) आली होती. तिच्या मागे रवींद्र जाधव देखील पोलीस ठाण्यात आला. दरम्यान, त्याच्या कारमध्ये (Car) घातक हत्यारे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक शैलेश पाटील, परि.उपनिरीक्षक गायधनी, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, भानुदास खेडकर, सुमित गवळी, सतीष त्रिभुवन, सतीष भवर, शफी शेख यांच्या पथकाला पंचासमक्ष कारची झडती घेण्यास सांगितली. पथकाने रवींद्र जाधव याची कारची (एमएच 15 सीडी 0591) झडती घेतली असता त्यामध्ये तलवार (Sword), सुरा मिळून आला. पोलिसांनी कार व हत्यारे जप्त केले. त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चांगदेव आंधळे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या