Friday, April 10, 2026
Homeक्राईमCrime News : घरात घुसून महिलेचा विनयभंग

Crime News : घरात घुसून महिलेचा विनयभंग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केडगाव परिसरात एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी (26 मार्च) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिताने फिर्याद दाखल केली आहे. ईश्वर अशोक पाचारणे (रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. फिर्यादी आपल्या पती, सासू व दोन मुलांसह केडगाव उपनगरात राहतात. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्या स्वयंपाक घरात काम करत असताना ईश्वर अशोक पाचारणे हा अचानक त्यांच्या घरात शिरला. त्याने फिर्यादीसोबत जबरदस्ती केली.

- Advertisement -

या प्रकारामुळे फिर्यादी यांना मनस्ताप झाला आणि त्यांनी प्रतिकार करत त्याचे हात झटकले. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला असता संशयित आरोपीने दरवाजा उघडून घरातून पळ काढला. घाबरलेल्या फिर्यादी यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या सासूला फोनवर सांगितला आणि नंतर हिंमत करून कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी ईश्वर अशोक पाचारणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ashok Kharat case : भोंदू अशोक खरात प्रकरण : रुपाली चाकणकरांच्या...

0
शिर्डी । Shirdi भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित गुन्ह्यांची व्याप्ती आता केवळ अत्याचार किंवा फसवणुकीपुरती मर्यादित राहिलेली नसून, यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर...