Monday, April 28, 2025
Homeक्राईमजमावाची दगडफेक करून तरुणास मारहाण

जमावाची दगडफेक करून तरुणास मारहाण

संगमनेर शहरातील घटना || तेरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरातील माधव टॉकीजजवळ तेरा जणांनी एकत्रितपणे दगडफेक करुन जवळून जाणार्‍या एका तरुणालाही लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. तसेच जखमी झालेल्या तरुणाच्या आईला धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी देत जवळील दोन चारचाकी वाहनांचेही नुकसान केले. सदर घटना शनिवारी (दि. 8 जून) सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की माधव टॉकीजजवळील वाडेकर गल्लीतील लीलावती सुभाष गरुडकर व त्यांचा मुलगा हे घरासमोर उभे होते. त्यावेळी तेराजण एकत्रितपणे गरुडकर यांच्या शेजारील मधुकर विठ्ठल नालकर यांच्या घराकडे शिवीगाळ करुन दगडफेक करत होते. त्याचवेळी गरुडकर यांचा मुलगा तेथून जात असताना तेरा जणांनी त्यास लोखंडी रॉडने मारुन जखमी केले. यावेळी त्याची आई मध्ये आली असता त्यांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. 

त्यानंतर घटनास्थळावरुन जाताना मुकुंद नारायण गरुडकर यांच्या दोन चारचाकी वाहनांचे नुकसान केले. याप्रकरणी जखमी तरुणाची आई लीलावती गरुडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तेरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक जाधव करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...