Friday, April 25, 2025
Homeक्राईमCrime News : युवकावर कोयता, चॉपरने प्राणघातक हल्ला

Crime News : युवकावर कोयता, चॉपरने प्राणघातक हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील क्लेरा ब्रुस बाँईज हॉस्टेल समोरील रस्त्यावर एका युवकावर कोयता, चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी (19 मार्च) मध्यरात्री घडली. अलजैद रहीम शेख (वय 22 रा. नालसाब चौक, सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून चार जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अलिरजा सुभेदार दादु, रबनावाज सुभेदार सलाऊद्दीन, अरफान सुभेदार सलाऊद्दीन आणि आर्यन इम्रान सुभेदार (सर्व रा. झेंडीगेट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अलजैद हे त्यांच्या कुटुंबासह नालसाब चौक येथे राहतात. मंगळवारी (18 मार्च) दुपारी तीन वाजता ते नालसाब चौक येथील पार्किंगजवळून जात असताना, संशयित आरोपींनी त्यांना अडवले. तू आमच्याकडे रागाने का पाहतो? असे विचारून, पुन्हा रागाने पाहिले, तर हात-पाय तोडून टाकू अशी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या अलजैद यांनी त्या ठिकाणाहून निघून जाणे पसंत केले. मात्र, दुसर्‍या दिवशी बुधवारच्या मध्यरात्री 12:20 वाजता, ते उपवासानंतर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले असताना, संशयित चौघा आरोपींनी त्यांना पाहताच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. विरोध केला असता, अलिरजा आणि रबनावाज यांनी त्यांना मारहाण केली.

यामध्ये त्यांना छाती आणि पोटावर मार बसला. यानंतर, जखमी अवस्थेत त्यांनी घरी जाऊन हा प्रकार त्यांच्या भावाला सांगितला. त्यानंतर, भाऊ तैसीन सोबत ते औषध घेण्यासाठी मेडिकलला जात असताना, क्लेरा ब्रुस बाँईज हॉस्टेल समोरील रस्त्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर चौघा संशयित आरोपींनी लोखंडी कोयता, चॉपर आणि लाकडी काठ्यांनी प्राणघातक वार केले. या मारहाणीत अलजैद शेख गंभीर जखमी झाले. मात्र, तेथून जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळ काढला. भाऊ तैसीन यांनी दुचाकीवरून येऊन त्यांना उचलले व इतर नातेवाईकांना बोलावून उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...