Tuesday, April 15, 2025
Homeक्राईमCrime News : युवकावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

Crime News : युवकावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शिवाजीनगर, कल्याण रस्ता येथील भावना ऋषी सोसायटीजवळ चार जणांनी मिळून युवकावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात राहुल प्रसाद देवेनपिल्ली (वय 21) हा युवक जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी (13 एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण भालेराव, अमय जाधव, सार्थक पवार आणि यश पडाळे (पूर्ण नावे माहिती नाहीत, सर्व रा. शिवाजीनगर, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना 12 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल डी. फार्मसीचे शिक्षण घेतात.

- Advertisement -

ते आपला मित्र अथर्व अंबर मेहसुनी (रा. शिवाजीनगर) यांच्यासोबत बालाजी सोसायटीकडे पायी जात असताना, भावनारूपी सोसायटीजवळ त्यांची संशयित आरोपींशी भेट झाली. त्यावेळी प्रवीण भालेराव याने कोणतेही कारण नसताना शिवीगाळ सुरू केली. राहुलने त्याला विरोध करताच यश पडाळे याने त्याचे हात पकडले, आणि अमय व सार्थक यांनी लाकडी दांडक्याने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. हे पाहून राहुलचा मित्र अथर्व घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. या दरम्यान, अमय जाधव याने आपल्या कमरेला लावलेला कोयता काढून राहुलच्या पोटावर वार केला. राहुल जोरात ओरडल्याने सर्व संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या राहुलवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी पूर्ण शुध्दीत आल्यानंतर पोलिसांना आपला जबाब दिला असून, पोलिसांनी संशयित चार आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार रमेश शिंदे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : जमिनीच्या व्यवहारावरून अल्पवयीन मुलावर हल्ला; गुन्हा दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे जमिनीच्या वादातून अल्पवयीन मुलावर लोखंडी गजाने हल्ला करून दुखापत केल्याची घटना शुक्रवारी (11 एप्रिल) सायंकाळी 7 वाजण्याच्या...