Monday, September 28, 2026
Homeक्राईमCrime News : युवकावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

Crime News : युवकावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शिवाजीनगर, कल्याण रस्ता येथील भावना ऋषी सोसायटीजवळ चार जणांनी मिळून युवकावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात राहुल प्रसाद देवेनपिल्ली (वय 21) हा युवक जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी (13 एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण भालेराव, अमय जाधव, सार्थक पवार आणि यश पडाळे (पूर्ण नावे माहिती नाहीत, सर्व रा. शिवाजीनगर, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना 12 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल डी. फार्मसीचे शिक्षण घेतात.

- Advertisement -

ते आपला मित्र अथर्व अंबर मेहसुनी (रा. शिवाजीनगर) यांच्यासोबत बालाजी सोसायटीकडे पायी जात असताना, भावनारूपी सोसायटीजवळ त्यांची संशयित आरोपींशी भेट झाली. त्यावेळी प्रवीण भालेराव याने कोणतेही कारण नसताना शिवीगाळ सुरू केली. राहुलने त्याला विरोध करताच यश पडाळे याने त्याचे हात पकडले, आणि अमय व सार्थक यांनी लाकडी दांडक्याने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. हे पाहून राहुलचा मित्र अथर्व घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. या दरम्यान, अमय जाधव याने आपल्या कमरेला लावलेला कोयता काढून राहुलच्या पोटावर वार केला. राहुल जोरात ओरडल्याने सर्व संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या राहुलवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी पूर्ण शुध्दीत आल्यानंतर पोलिसांना आपला जबाब दिला असून, पोलिसांनी संशयित चार आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार रमेश शिंदे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar NCP: आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत...

0
मुंबई | Mumbaiराज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष...