Saturday, March 29, 2025
Homeनगरजुन्या वादातून युवकावर तलवारीने हल्ला

जुन्या वादातून युवकावर तलवारीने हल्ला

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा (Newasa) तालुक्यातील अमळनेर येथे जुन्या वादाच्या (Dispute) कारणातून युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची घटना घडली. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार पांडुरंग दत्तात्रय पवार (वय 24) रा. वाटापूर हे 18 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास वाटापूर ते करजगाव रोडवर मोरे वस्ती अमळनेर येथून जनावरांची औषधे आणण्यासाठी जात असताना त्याठिकाणी एक विना नंबरची दुचाकी व चारचाकी वाहनातून आलेले शरद निवृत्ती चोपडे, बंटी औटी (दोघे रा. वाटापूर), प्रकाश थोरात व एक अनोळखी (दोघे राहणार तमनर आखाडा ता. राहुरी) यांनी फिर्यादी यास धक्का देत खाली पाडत शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण (Beating) केली व सोबत आणलेल्या लोखंडी पाइप, तलवारीने फिर्यादी यास मारहाण करत जखमी (Injured) केले व जिवे मारण्याची धमकी दिली.

- Advertisement -

20 जुलै रोजी दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र नं. 310/2024 बीएनएस 118 (1), 115(2), 352, 351 (2)(3), 324(4)(5), आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बी.एम.तागड हे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अरे बापरे…, धुळ्यात 300 किलो बनावट पनीर जप्त

0
धुळे : (प्रतिनिधी) । अरे बापरे…, धुळ्यात बनावट पनीर तयार करण्याचा कारखाना आढळून आला असून आज सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार...