Saturday, May 4, 2024
Homeनाशिकवीज चोरी प्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दखल

वीज चोरी प्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दखल

नाशिक । प्रतिनिधी

वडाळागाव परिसरात तिघा संशयितांनी महावितरणची तब्बल 4 लाखांची वीज चोरी केल्याची घट्ना समोर आली आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या गुन्हयामध्ये तिघा संशयितावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पहिल्या गुन्हयात इंंदिरानगर येथील सहाय्यक अभियता मंगेश सुरेश सोनगिरे (वय 38) यांच्या तक्रारीवरुन शेख शकिल हाजीमुनाफ, अफजल शेख (रा. मेहबुबनगर, वडाळागाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या दोघा संशयितांनी त्यांच्या एलअ‍ॅड टी कंपनीच्या विज मीटरमध्ये छेड्छाड करुन तब्बल 2 लाख 80 हजार 870 रुपये किंमतीची 17 हजार 418 युनिट्ची वीज चोरी केल्याचे तपासात उघड्कीस आले.

तर दुसार्‍या घट्नेत मेहबुबनगर परिसरातच राहणारा सलीम इब्राहीम शेखे याने गोडावूनसाठी अनाधिकृतपणे विजेचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले. मागील सहा महिन्यापासून या संशयितानी 13 हजार 284 युनिट्ची चोरी करुने महावितरणची 1 लाख 47 हजार 460 रुपयांची वीज चोरी केली. सलीम शेख या संशयिताविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार ए.एल.शेख करीत आहे. दरम्यान महावितरण च्या अधिकार्‍यांनी केलेल्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या