Friday, March 28, 2025
Homeक्राईमवाईन शॉपीसमोर येताच गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

वाईन शॉपीसमोर येताच गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

दोन महिन्यांपासून होता पसार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दहशत करणारा व नऊ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाईन शॉपी समोर येताच तोफखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. करण खंडू पाचारणे (रा. बोल्हेगाव) असे त्याचे नाव आहे. एमआयडीसीतील राहुल वाईन शॉपी समोर पोलिसांनी शनिवारी (8 जून) रात्री ही कारवाई केली.

- Advertisement -

पाचरणे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात चार व एमआयडीसी पोलीस ठाण्यात पाच असे एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन महिन्यांपूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात तो पसार होता. त्याचा शोध पोलीस घेत असताना तो एमआयडीसीतील राहुल वाईन शॉपी समोर येणार असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.

पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, संदीप धामणे, वसिम पठाण, सुमीत गवळी, सतीश त्रिभुवन, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतीश भवर, बाळासाहेब भापसे यांच्या पथकाने राहुल वाईन शॉपी परिसरात सापळा लावून पाचरणेला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार प्रमिला गायकवाड करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ मार्च २०२५ – सामर्थ्याचे बळ

0
निश्चयाचे बळ अंगी असेल तर अशा व्यक्तीचा स्वतःकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समाजाला चमत्कार वाटू शकेल अशी कामे अशी व्यक्ती करू शकते. ‘निश्चयाचे...