Sunday, October 13, 2024
Homeनगरपोलिसांच्या ताब्यातून पळालेला सराईत साथीदारांसह जेरबंद

पोलिसांच्या ताब्यातून पळालेला सराईत साथीदारांसह जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मागील 5 वर्षापुर्वी मंचर (जि. पुणे) पोलिसांच्या हातून राहुरी (Rahuri) येथुन पळालेला सराईत गुन्हेगाराला (Criminal) तीन साथीदारांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुस, सोन्याचे दागिने, दुचाकी असा तीन लाख 27 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुलीला नग्न फोटो पाठविले, बेलापुरातील तरुणावर गुन्हा

सराईत गुन्हेगार तुकाराम ऊर्फ राजेंद्र बन्सी वारे ऊर्फ मधे (वय 21 रा. माळवाडी पळशी ता. पारनेर) याच्यासह रोशन संपत रोकडे (वय 23 रा. वडगाव सावताळ ता. पारनेर), प्रवीण लक्ष्मण दुधावडे (वय 21 रा. अकलापुर घारगाव ता. संगमनेर), दीपक मधुकर शिंदे (वय 20 रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर) अशी पकडलेल्या आरोपींची (Accused) नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, भिमराज खर्से, संतोष खैरे, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, सोनाली साठे, उमाकांत गावडे यांचे पथक फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना त्यांना तुकाराम ऊर्फ राजु वारे हा त्याच्या साथीदारांसह गावठी कट्टा (Gavathi Katta), जिवंत काडतुस (Live Cartridge) व सोन्याचे दागिने (Gold Jewelry) विक्री करण्याकरीता नगर कल्याण रस्ता, पारनेर फाटा, टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी सापळा लावून सराईत गुन्हेगार वारे व त्याचे तीन साथीदारांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे गावठी कट्टा, तीन काडतुसे, चोरीचे दागिने, दुचाकी मिळून आली. पोलिसानी तिघांना अटक (Arrested) केली असून मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.

दिवाळीला मिळणार रवा, चणाडाळ, साखर, तेल, मैदा व पोहे

वारे टोळी महिलांना लुटायची

वारे व त्याचे साथीदार हे शेतात, वस्तीवर असलेल्या एकट्या महिलेला गाठून तिच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेत असे. त्यांनी पारनेर तालुक्यातील वासुंदे, वडगाव सावताळ व ढोकी येथील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच दुचाकी मलठण फाटा, शिक्रापुर (ता. शिरूर, जि. पुणे) येथुन चोरी केल्याची कबुली दिल्याने नगर व पुणे जिल्हातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपीला भेटण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर

पोलिसांवर केली होती दगडफेक

तुकाराम ऊर्फ राजेंद्र बन्सी वारे ऊर्फ मधे हा सराईत गुन्हेगार असुन त्याला पाच वर्षापूर्वी मंचर पोलिसांनी अटक केली होती. त्याला मंचर पोलिसांनी तपासकामी राहुरी परिसरात आणले होते. त्यावेळी त्याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन बेडीसह पलायन केले व पोलीस पथकावर दगडफेक केली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्या विरूध्द नगर व पुणे जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चोरी व इतर कलमान्वये एकुण 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नगरमध्ये 24 जुगारी पकडले

- Advertisment -

ताज्या बातम्या