Thursday, May 15, 2025
Homeक्राईमCrime News : सिध्दार्थनगरचा भाई नाशिक कारागृहात स्थानबध्द

Crime News : सिध्दार्थनगरचा भाई नाशिक कारागृहात स्थानबध्द

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्याकडून एमपीडीए कायद्यान्वये कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

अहिल्यानगर शहरातील तोफखाना हद्दीत व भिंगार परिसरात सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणारा व मोक्का, दरोडा, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, खंडणी, हाणामारी असे गंभीर गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे (वय 34, रा. मुन्सीपल कॉलनी, सिध्दार्थनगर) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार तोफखाना पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन नाशिक येथील कारागृहात स्थानबध्द केले आहे.

विजय पठारे याच्यावर तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, खंडणीसाठी दरोड्यासह खुनाचा प्रयत्न करणे, संघटीत गुन्हेगारांची टोळी बनवून दरोडा टाकणे, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सन 2021 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यातून जामीन मिळाल्यावरही त्याच्यावर पुन्हा गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधिक्षकांकडे सादर केला होता. अधीक्षक राकेश ओला यांनी पडताळणी करून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी विजय पठारे याला स्थानबध्द करण्याचे आदेश काढले. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द केले आहे.

सदरची कारवाई अधीक्षक ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, शहर उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक शैलेश पाटील, अंमलदार रवींद्र पांडे, सुनील शिरसाठ, विनोद गिरी, संपदा तांबे, सतीश त्रिभुवन, योगेश चव्हाण, भानुदास खेडकर, सुजय हिवाळे, सुरेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, वाळूतस्कर तसेच संघटीतपणे गुन्हे करणार्‍या टोळीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येत आहे.
– राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...