Saturday, July 27, 2024
Homeनगरदरोड्याच्या तयारीतील 11 सराईत गुन्हेगार राहुरीत जेरबंद

दरोड्याच्या तयारीतील 11 सराईत गुन्हेगार राहुरीत जेरबंद

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर – मनमाड महामार्गावरील राहुरी खुर्द येथील शनिशिंगणापूर फाट्यावर शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेली 11 सराईत गुन्हेगारांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतले. तर 3 जण अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, 3 ऑक्टोबर रोजी रात्री शनिशिंगणापूर फाट्यावर 10 ते 15 इसम कोठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबलेले आहेत. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील तुषार धाकराव, सोपान गोरे, मनोजर शेजवळ, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, विशाल दळवी, विजय ठोंबरे, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजित जाधव, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर, अर्जुन बडे, अरुण मोरे या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

पथकाने तात्काळ शनिशिंगणापुरकडे जाणार्‍या रोडलगत जाऊन खात्री केली असता तेथे टपरीचे आडोशाला अंधारात काही इसम बसलेले दिसले. टपरीजवळ 2 चारचाक्या, 2 दुचाक्या, उभ्या होत्या. त्यापैकी एका दुचाकीजवळ तीन इसम उभे असल्याचे दिसले. सदर ठिकाणी अचानक छापा टाकला असता 3 जण मोटारसायकल चालू करुन वेगात निघुन गेले. अंधारामध्ये बसलेले उर्वरीत इसम पळण्याच्या तयारीत असताना त्यांना बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. त्यात राहुल किशोर भालेराव, (वय 23 वर्षे, रा. वडाळा महादेव, श्रीरामपूर), संतोष सुखराम मौर्या (वय 50 वर्षे, रा. नेवासा रोड श्रीरामपूर, मुळ रा. लोथा, जिल्हा- फत्तेपूर, उत्तरप्रदेश), सागर विश्वनाथ पालवे (वय 27, रा. गजानन कॉलनी, अहमदनगर, मुळ रा. मेहेकरी ता. नगर), बबलु उर्फ दानिश शौकत शेख (वय 24 वर्षे, रा. वार्ड नं. 01 श्रीरामपूर), आदिनाथ सुरेश इलग (वय 26 वर्षे, रा. मोरेचिंचोरे, ता. नेवासा), रितेश सुरेश दवडे (वय 21 वर्षे, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर), दीपक महादेव साळवे (वय 30 वर्षे, रा. मोरेचिंचोरे, ता. नेवासा), रमेश भाऊसाहेब वाकडे (वय 23 वर्षे, रा. भोकर, ता. श्रीरामपूर), प्रितमसिंह जगदिपसिंह ज्युनी (वय 23 वर्ष, रा. वार्ड नं. 03 श्रीरामपूर), मिलींद मोहन सोनवणे (वय 29 वर्षे, रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर), अविनाश कारभारी विधाते (वय 27 वर्षे, रा. म्हसोबानगर, घुलेवाडी, ता. संगमनेर) यांचा समावेश आहे. तर पसार झालेल्यांची नावे दादा खंडु गांगुर्डे, शिवाजी मिठु शिंदे व संतोष शेषराव निकम (तिघे रा.कात्रड, ता. राहुरी) अशी आहेत.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेतली असता एक गावठी कट्टा, 6 जिवंत काडतुस, तलवार, 2 सुरे, चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके, मिरचीपुड, दोन चारचाक्या, एक दुचाकी, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गॅसटाकी, गॅस कटर, ऑक्सिजन सिलेंडर, रोख रक्कम, 9 विविध कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण 8 लाख 53 हजार 810 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला.

या आरोपींविरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 1243/2023 भादंवि कलम 399, 402 सह आर्म अ‍ॅक्ट 3/25 व 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, कोपरगाव, सोनई, श्रीरामपूर, राहुरी, अकोले या ठिकाणचे 9 गुन्हे केल्याची कबुली दिल्याने जबरी चोरी, एटीएम चोरीचा प्रयत्न व मंदिरातील चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी राहुल भालेराव दानिश ऊर्फ बबलु शेख, रमेश वाकडे, सागर पालवे, आदिनाथ इलग, संतोष मौर्य, मिलिंद सोनवणे, अविनाश विधाते हे सराईत गुन्हेगार असून यांच्या विरुध्द अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहे.

कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर व श्रीरामपुर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या