Monday, September 16, 2024
Homeजळगावनिमित्त विवाह सोहळ्याचे टिका एकनाथराव खडसेंवर

निमित्त विवाह सोहळ्याचे टिका एकनाथराव खडसेंवर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

- Advertisement -

भाजपाचे माजी मंत्री (Former BJP Minister) आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांची कन्या श्रेया हिच्या विवाहसोहळ्यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे,(Union Minister Narayan Rane) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, (Minister of State Raosaheb Danve) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State President Chandrakant Patil) यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांची फौज रविवारी जामनेरात दाखल झाली होती. निमित्त जरी विवाहसोहळ्याचे (Wedding) असले तरी याठिकाणी देखिल भाजपाच्या (bjp) नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंसह (NCP leader Eknathrao Khadse) आघाडी सरकारवर (government) टिका (Criticize) करण्याची संधी सोडली नाही.

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse)) यांनी दोन दिवसांपुर्वी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून शेलक्या शब्दात टोले हाणले होते. त्याचाच वचपा काढण्यासाठी रविवारी आमदार गिरीश महाजन यांच्याकडील विवाहसोहळ्याच्या निमित्ताने आयती संधीच भाजपाच्या या नेत्यांना मिळाली होती. या दोन्ही नेत्यांशी माध्यमांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी एकनाथ खडसेंवर टिका (Criticize) करीत महाविकास आघाडीला चांगलेच चिमटे घेतले.

पेनड्राइव्ह आले, सीडीची वाट बघतोय

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Leader of Opposition Devendra Fadnavis) जे पेनड्राइव्ह (Pendrive) दिले त्यात सत्यता आहे. आणि सत्यता नसेल तर अ‍ॅड. चव्हाणांचा राजीनामा का घेतला? राजीनामा घेतला असेल तर फॉरेन्सीक चौकशी (Forensic inquiries) झाली पाहिजे. आमच ठाम मत आहे, यामध्ये सत्य दडले आहे ते बाहेर काढले पाहिजे. ज्यांनी असे कृत्य केले त्याला शासन करा. अजून चार पेनड्राइव्ह आहे. तिकडचा एखादा आला की आम्ही तिसरा काढु. तिकडच्या सीडीची ( cd) आम्ही वाट बघत असल्याचा टोला भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister of State Raosaheb Danve) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता लगावला. शिवसेना एमआयएमसोबत गेली काय आणि नाही गेली काय? काही फरक नाही. शिवसेनेने (Shiv Sena) भगवा सोडुन आधीच हिरवे पांघरले असल्याची टिका (Criticize) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केली.

नाथाभाऊंसारखे नेते सरकारला त्रास द्यायला समर्थ

एका पक्षाला चालवणं कठीण असतं. तीन पक्ष (Three parties) एकत्र आल्यानंतर नीट चालणं हे महाअवघड आहे. निवडणुकांमध्ये (Election) अशा प्रकारचे प्रश्न खुप पडणार आहे. त्यामुळे आम्ही काही सरकार पाडण्याच्या भानगडीत पडणार नाही. नाथाभाऊंसारखे (Nathabhau) नेते सरकारला त्रास द्यायला समर्थ असल्याचे प्रत्युत्तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील( State President Chandrakant Patil) यांनी खडसेंना दिले आहे. पक्ष वेगळा असला तरी नाथाभाऊ आजही आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. ते जाऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि मी त्यांना थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यांनी पक्षांतर केले. तिथे गेल्यानंतर आम्ही काही त्यांच्यावर टिका करीत नाही. ते रोज मात्र आमच्यावर टिका (Criticize) करतात. आम्ही रिअ‍ॅक्ट होणार नाही, पण एक स्टेज येईपर्यंत आम्ही नक्कीच त्यांच्याविरूध्द रिअ‍ॅक्ट होऊ असा इशाराच प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना दिला.

शिवसेना दिशाहिन पक्ष

भाजपाचे नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार टिका (Criticize) केली आहे. एमआयएमने दिलेल्या ऑफर संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना (Shiv Sena) म्हणजे दिशाहिन पक्ष अशी खरमरीत टिका केली. ते कुणासोबतही युती करतील. शिवसेनेला काही तत्व नाही, धोरण नाही. हि पुर्वीची शिवसेना नाही असा टोलाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या