Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याबेमोसमी पावसाने झोडपले; द्राक्षबागांमध्ये गुडघाभर पाणी

बेमोसमी पावसाने झोडपले; द्राक्षबागांमध्ये गुडघाभर पाणी

नाशिक | इगतपुरी तालुक्यात बेमोसमी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज असून घोटी, इगतपुरी, वाडीव-हे परिसरात मुसळधार पावसाने तब्बल दोन तास हजेरी लावल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

इगतपुरी तालुक्यात भाजीपाला पीके, द्राक्ष, गहु, हरभरा, भुईमुग, टोमॅटो, बाजरी इतर रब्बी पीके घेतली जातात.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान होते यामुळे रोगांच्या सावटापासून पिकांना वाचविन्यासाथि शेतकरी पिकांना महागड़ी औषधाची फवारणी करत होते.

मात्र, आज बेमोसमी मुसळधार पाऊस कोसळल्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

तसेच साठविलेल्या चा-याचेही मोठे नुकसान झाले आहे.द्राक्ष मन्यांमध्ये पाणी उतरत असल्याने द्राक्ष पिकास तडे जाण्याची शक्यता आहे तसेच रोगंचा प्रादुर्भाव होणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

तर जनावरांसाठी महागड़ा चारा विकत घेवून तो साठविला जातो असा साठविलेल्या चा-याचे या पावसामुळे नुकसान झाले आहे.भाजीपाला पीके आणि रब्बी पीके यांचे देखील मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या