Wednesday, March 26, 2025
Homeनगरशेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा - ना. विखे

शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा – ना. विखे

राहाता |प्रतिनिधी| Rahata

महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी एक रुपयात पीक विमा योजनेतून जिल्ह्यातील 11 लाख 88 हजार शेतकर्‍यांना 1129.37 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही लवकरच सुरू होणार असून आत्तापर्यंत 264.23 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आले आहेत.

- Advertisement -

केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी व आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली. याच धर्तीवर राज्य सरकारने खरीप हंगाम 2023 पासून एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. या योजनेत जिल्ह्यातील 11 लाख 88 हजार शेतकर्‍यांना सहभाग नोंदविला होता. मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना या योजनेच्या माध्यमातून 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यात आली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकर्‍यांना उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पीक कंपनी एकूण 1129.37 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. ही रक्कम शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना उपलब्ध होणार्‍या विमा रक्कमेचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत. अकोले तालुका 47.367 कोटी, संगमनेर 128.98 कोटी, राहाता 121.22 कोटी, श्रीरामपूर 69.56 कोटी, नेवासा 87.94 कोटी, कोपरगाव 79.59 कोटी, राहुरी 103.35 कोटी, पाथर्डी 75.64 कोटी, पारनेर 123.01 कोटी, नगर 65.53 कोटी, शेवगाव 9.77 कोटी, श्रीगोंदा 48.78 कोटी, कर्जत 93.85 कोटी, जामखेड 74.51 कोटी रुपये इतकी भरपाई मंजूर झाली आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना भरपाई मिळण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असून विमा कंपनी व राज्य शासना मार्फत विमा रक्कमेचा उर्वरित निधी शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

रुपयात पीक विमा योजना सुरु करणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका या योजनेच्या माध्यमातून सरकारची आहे. यापूर्वी 25 टक्के अग्रीम रक्कम देऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता उर्वरित रक्कमही मंजूर झाल्याने या नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांना लवकरच उपलब्ध होईल.
– ना. राधाकृष्ण विखे पाटील

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sinhastha Kumbhamela Review Meeting: नदी प्रदुषण रोखण्यासाठी २९ नाले बंदिस्त करणार;...

0
नाशिक | प्रतिनिधीमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नाशिकच्या विकासकामांबद्दल प्रशासन गतीने कामाला लागले असून, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मलजल वाहून नेणारे २९ नाले बंदिस्त करण्याचे नियोजन सुरू...