Thursday, January 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis: राज्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका; पिकांचे पंचनामे...

CM Devendra Fadnavis: राज्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका; पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश

मुंबई | प्रतिनिधी
मुंबईसह राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या पावसामुळे जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात १८ ते २१ ऑगस्ट दरम्यान विविध भागात पुन्हा अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून १५ ते १६ जिल्ह्यात रेड ॲलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. अतवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. नांदेड विभागात त२०६ मिमी इतका ढगफुटीसदृश पाऊस झाला असून तिथे एनडीआरएफ,एसडीआरएफसोबत आता सैन्यदलाला देखील मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. मुंबईत सोमवारी सकाळी ६ नंतरच्या सहा तासात १७० मिमी पाऊस झाला. मुंबईत मंगळवारी चार मीटरपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी. तसेच राज्यातील ज्या भागात रेड ॲलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तेथील नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.

- Advertisement -

राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात बीड,लातूर आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे. पुढचे तीन दिवस बीड,लातूर,नांदेडमध्ये पूरस्थिती संभावित आहे. मुखेड भागात २०६ मिमी पाऊस झाला असून पाच लोक बेपत्ता आहेत. तसेच १५० पेक्षा जास्त जनावरे मृत अथवा वाहून गेली आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील तीन जिल्ह्यांचा विचार केला तर ८०० गावे बाधित असून एक लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

YouTube video player

कोकणात जगबुडी,अंबा,कुंडलिका या नद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. वशिष्ठीमुळे चिपळूणमध्ये पूर असल्याने त्यावरही लक्ष आहे. कोल्हापूर,सातारा घाट विभागात रेड ॲलर्ट आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणात चांगले पाणी आहे. पण कुठलेच धरण इशारा पातळीपर्यंत नाही. अलमट्टीचा धोका कोल्हापूरला होण्याची शक्यता असल्याने कर्नाटक सरकारसोबत वरिष्ठ स्तरावरून चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नुकसानभरपाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
घरांचे नुकसान, माणसे, जनारांचे मृत्यू याबाबत नुकसान भरपाईचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. घरांचे नुकसान झालेल्यांना तात्पुरते निवारे उभारण्याचे आणि तेथील लोकांना जेवण आणि पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याचे आदेश देण्यात आल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईतील मेट्रो सेवा सुरळीत
मुंबईला बसलेल्या पावसाच्या तडाख्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. काही ठिकाणी लोकल उशीराने धावत होत्या. मात्र लोकल सेवा कुठेही ठप्प पडलेली नाही. मेट्रो सेवा मात्र सुरळीत होती, ही समाधानाची बाब आहे. मुंबईकरांना भविष्यात मेट्रोच्या रुपाने सुकर प्रवास मिळणार आहे हे यातून दिसून आल्याचे फडणवीस म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...