Friday, September 20, 2024
Homeनगरपिकविम्याची उर्वरित रक्कम त्वरित मिळावी - विवेक कोल्हे

पिकविम्याची उर्वरित रक्कम त्वरित मिळावी – विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

2023 मध्ये कोपरगाव मतदारसंघातील (Kopargav Constituency) हजारो शेतकर्‍यांनी सोयाबीन (Soybeans) आणि मका (Maka) या खरीप पिकांचा विमा (Crops Insurance) उतरविला होता. पर्जन्यमानानुसर सर्व्हे होवून त्याप्रमाणे शेतकरी पात्र झाले होते. नैसर्गिक संकटाने झालेल्या नुकसानीपोटी मिळणारी पीकविमा रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही. तरी लवकरात लवकर उर्वरित 75 टक्के रक्कम पीक विमा कंपनीने शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करावी यासाठी सूचना कराव्या, अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी शासनाकडे केली.

शासनाने काही कालावधीपूर्वी पीकविमा (Crops Insurance) रकमेचे वितरण केले मात्र ते 25 टक्के अंतरिम विमा म्हणून देण्यात आले. अद्यापही 75 टक्के बाकी असल्याने शासनाने दखल घेण्याची गरज आहे.पीकविमा कंपन्या कोट्यावधी रुपयांचे विमे उतरवीतात मात्र प्रत्यक्ष शेतकर्‍यांना लाभ देण्याची वेळ येते तेव्हा वेळकाढूपणा होतो त्यावर कार्यवाही होऊन तातडीने कार्यवाही व्हावी.

जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आवाहन करत शेतकर्‍यांना पीक विमा भरण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकर्‍यांना तात्काळ मदत व्हावी, अशी भावना शेतकरी वर्गात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या