Friday, September 20, 2024
HomeनाशिकBail Pola 2024 : पोळ्याचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी

Bail Pola 2024 : पोळ्याचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी

डांगसौंदाणे | वार्ताहर | Dangsaundane

- Advertisement -

शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलाच्या कृतज्ञतेसाठी पिठोरी अमावस्येला बैल पोळा (Bail Pola) सण साजरा करण्यासाठी शेतकरी (Farmer) बांधव सज्ज झाले आहेत. सर्जा-राजाच्या शृंगारसाठी साहित्य खरेदीसाठी आठवडे बाजार शेतकऱ्यांच्या गर्दीने अक्षरशः फुलून निघाले आहेत. सर्जा-राजाच्या प्रति असलेल्या शेतकऱ्यांच्या भावनेला ओळखून ग्रामीण भागात (Rural Area) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेतमालाला योग्य भाव मिळो किंवा न मिळो, दुष्काळी परिस्थिती असो किंवा नसो, बळीराजा आपला उत्साह कमी न करता हा सण साजरा करण्यासाठी तत्पर असतो.

हे देखील वाचा : Nashik Crime News : निशाचा मृत्यू संशयास्पद नव्हे तर खूनच

यांत्रिकीकरणाच्या युगात बहुतांश शेतकऱ्यांनी बैल पाळणे कमी केले असले तरी, काही महत्त्वाच्या शेतीच्या कामांसाठी (Agricultural Work) आजही बैलजोडीची आवश्यकता असते. अनेक मोठे शेतकरी हौसेने बैलजोडी पाळतात आणि त्यासाठी मोठा खर्च करण्यासही तयार असतात. ग्रामीण आणि आदिवासी भागातील बहुतांश शेतकरी आजही बैलजोडी पाळताना दिसतात. मोलमजुरी करून स्वतःची शेती करणारे हे बांधव आपल्या सर्जा-राजाच्या सणासाठी आठवडे बाजारात मोठी खरेदी करत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पित्याकडून गतिमंद मुलीवर अत्याचार

गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे (Rain) दुष्काळाचे सावट वर्षभर जाणवले खरीप व रब्बी पिकांचे उत्पादन पावसाअभावी घटले. त्यामुळे आर्थिक विवंचनेला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र, यंदा वरून राजाने चांगली कृपा करत सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी केल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून गाव तलाव देखील पाण्याने भरले गेले आहेत. खरीप पाठोपाठ या पावसाचा रब्बी पिकांना देखील लाभ मिळणार असल्याने शेतकन्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून यंदाचा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे देखील वाचा : त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! नाशिक-डहाणू नवीन मार्गाच्या अंतिम लोकेशन सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

दरम्यान, या सणासाठी मालेगाव, धुळे, सटाणा, कळवण यांसारख्या ठिकाणाहून बैल पोळ्यासाठी लागणाऱ्या साज-शृंगाराचे साहित्य विक्रीसाठी व्यापारी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाले आहेत. चांगला पाऊस पडल्याने यंदा साहित्य विक्री मोठ्या प्रमाणात होईल या आशेने नेहमीच्या बाजारापेक्षा १०० ते १५० दुकानांची अधिक भर पडली आहे. विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू शेतकरी वर्गाकडून खरेदी केल्या जात आहे, पंचक्रोशीतून आलेला शेतकरी खरेदीसाठी दाखल होत असल्याने बाजारपेठ गजबजून गेली आहे. गत वर्षाच्या तुलनेने यंदा साज शृंगाराच्या किमतीत काहीशी वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांतर्फे सर्जा राजाच्या शृंगाराचे साहित्य मोठ्या उत्साहात खरेदी केले जात आहे.

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा लढविण्यासाठी आग्रही

सजावट साहित्य दर

माठो जोडी १००/५००,
मोरखी जोडी-६०/२५०,
गेजा जोडी-१००/३००,
नाथजोडी-५०/१००,
पायातील पैंजण ४ नग २००,
गळ्यातील माळा जोडी ५०/१००,
कलर डबी १ नग ४० ते ८० (एशियन)

या वर्षी पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे बाजारात उत्साह आहे, शेतमालाला दर चांगला मिळाल्याने शेतकरी समाधानी असल्याने सर्जा राजा साठी सजावटीचे साहित्य खरेदी करतांना आनंदी आहे.

युसूफ बोहरी, सटाणा

माझ्याकडे गेली ३० वर्ष बैलजोडी आहे वडिलोपार्जित शेती व्यवसाय करतांना बैलां विषयी विशेष आकर्षण असल्याने मी दर वर्षी सजावटीचे साहित्य खरेदी करतांना आनंदाने खर्च करतो, काही विशेष साहित्य नैताळे यात्रेत मिळत असल्याने तेथे ही खरेदी साठी जातो.

साहेबराव सोनवणे, शेतकरी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या