नाशिक | Nashik
सलग सुट्यांमुळे नाशिककरांनी (Nashik) पर्यटनासाठी (Tourism) विविध ठिकाणी गर्दी केली असून आज सोमवार रोजी देखील सुट्टी असल्याने अनेक पर्यटक घराबाहेर पडले आहेत….
दरम्यान दोन दिवसांपूर्वी सलग सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या (Nashik Rural Police) वतीने महत्वाच्या पर्यटनास्थळांवर बंदोबस्तही (Deployment of Police) करण्यात आला आहे. त्यामुळे कराेनाच्या पार्श्वभूमीवर (Corona Crisis), नियम पाळूनच आनंद साजरा करावा. जेथे हुल्लडबाजी केली जाईल, तेथे पाेलिस संबंधितांवर कारवाई करतील, अशी माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक सचिन पाटील (District Police Superintendent Sachin Patil) यांनी दिली.
लागून आलेल्या सुट्यांसह कराेनाचे कडक निर्बंध शिथिल करण्यात आल्याने बऱ्याच कालावधीनंतर नाशिककर घराबाहेर पडले आहेत. शनिवार, १५ ऑगस्ट आणि आज सोमवार पतेती ची सुट्टी असल्याने विविध पर्यटनस्थळांवर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिक ग्रामीण पाेलिसांच्या हद्दीतील महत्त्वाची पर्यटनस्थळांवर पाेलिसांचा बंदाेबस्त असून काही ठिकाणी नाकाबंदी करून पाॅइंट्सवर तपासणी केली जात आहे. यासाठी अतिरिक्त पाेलिस बंदाेबस्त तैनात आहे.
श्रावणी साेमवारनिमित्त (Shravani Somwar) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथेही गर्दी हाेत असते. मात्र, यंदा मंदिरांसह ब्रह्मगिरी फेरीचा (Bramhagiri Feri) प्रदक्षिणा मार्गही बंद आहे. येथे पाेलिस बंदाेबस्त तैनात असून इगतपुरी (Igatpuri), घाेटी व त्र्यंबकेश्वर येथील रिसॉर्ट, तसेच धबधब्याच्या ठिकाणांवर गर्दी होऊ नये, यासाठी त्या त्या पोलिस ठाण्यांच्या पाेलिस निरीक्षकांनी बंदाेबस्त वाढविला आहे.