Friday, May 30, 2025
Homeदेश विदेशगद्दार! अवघ्या ३५०० रुपयांसाठी देशाशी केली गद्दारी, CRPF अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

गद्दार! अवघ्या ३५०० रुपयांसाठी देशाशी केली गद्दारी, CRPF अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सीआरपीएफचा सब इन्स्पेक्टर मोती राम जाटबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आठवड्याभरापूर्वी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्लीतून एका CRPF अधिकाऱ्याला अटक केली. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा, पाकिस्तानमधील लष्करी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप मोती राम जाटवर ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

मोती राम जाटला मागच्या आठवड्यात अटक केल्यानंतर सीआरपीएफने या अधिकाऱ्याला बडतर्फ केले आहे. मोती राम जाटने पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जम्मू-काश्मीर दौरा, ५० पर्यटन स्थळे बंद करण्याचे निर्णय, सीआरपीएफच्या तळांवरील मनुष्यबळ आणि त्यांच्या हालचाली, दहशतवाद्यांचे संभाव्य ठावठिकाणे यासंदर्भातली माहिती पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना पुरवल्याचे सांगितले जात आहे.

महिला एजंटने पत्रकार म्हणून स्वतःची ओळख
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी मोती राम जाट तेथे तैनात होता. तो गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानसाठी हेरगिरीचे काम करत होता. ज्या महिला पाकिस्तानी एजंटने पहिल्यांदा त्याच्याशी संपर्क साधला तिने स्वतःची ओळख एका मोठ्या टीव्ही चॅनेलची पत्रकार म्हणून करून दिली होती. ती मोती रामला दरमहिन्याला ३५०० रुपये देत असे. विशेष माहितीसाठी ती १२००० रुपये द्यायची अशी माहिती त्याने दिली आहे.

सुरुवातीच्या काही मेसेजेस आणि फोन कॉल्सनंतर या अधिकाऱ्याने तिला माहिती पुरवायला सुरुवात केली. यादरम्यान दोघांमध्ये काही व्हिडीओ कॉलदेखील झाले. दोन ते तीन महिन्यांनंतर एक पाकिस्तानी गुप्तहेर अधिकारी त्याच वाहिनीतील महिला पत्रकाराचा सहकारी म्हणून या अधिकाऱ्याशी बोलू लागला.

फोनमधून उघड झाले सत्य
एनआयए आणि सीआरपीएफने मोती रामच्या फोनचा तपासणी केली. त्याच्या फोनमध्ये महिलेसोबतच्या सर्व चॅट्स सापडल्या. मोती रामने कोणताही मेसेज डिलीट केलेला नव्हता. त्याने अनेक गोपनीय कागदपत्रे शेअर केली. यामध्ये सुरक्षा दलांच्या तैनातीची माहिती होती. जवानांच्या हालचालींची माहिती होती. गुप्तचर संस्थांच्या मल्टी-एजन्सी सेंटर (एमएसी) कडून एक रिपोर्ट होता. दहशतवाद्यांच्या संभाव्य ठिकाणांची माहिती देखील होती. अनेक वेळा मोती रामने वर्तमानपत्रातील कटिंग्ज पाठवल्या. पण पाकिस्तानी एजंट्ने त्याला सार्वजनिक माहिती देऊ नकोस असे सांगितले.

पहलगाम हल्ल्याआधी बदली
२२ एप्रिलला पहलगाम हल्लावरील हल्ला होण्याच्या पाच दिवस आधीच मोती राम जाटची दिल्लीला बदली करण्यात आली होती. त्याने दिल्लीला आल्यानंतरदेखील गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याची माहिती पाकिस्तानमधील हस्तकांना पुरवली होती. दरम्यान, अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत जाटने माहिती देताच समोरील व्यक्तीने जी माहिती इतर ठिकाणी नाही, अशी माहिती देण्यास त्याला सांगितल्याचीही बाब समोर आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लाडकी

Ladki Bahin Yojana: धक्कादायक! राज्यातील ‘इतक्या’ सरकारी कर्मचारी महिलांनी घेतला लाडकी...

0
मुंबई | Mumbai राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लाडकी बहीण योजना सुरु करण्यात...