Tuesday, July 23, 2024
Homeनगरक्रुझर व इको व्हॅनच्या धडकेत सहा जण जखमी

क्रुझर व इको व्हॅनच्या धडकेत सहा जण जखमी

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

- Advertisement -

भरधाव क्रुझर व इको व्हॅनच्या धडकेत (Cruiser and Eco Van Accident) सहा जण किरकोळ जखमी (Injured) तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना लाडगाव (Ladgav) चौफुलीवर दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.

लाडगाव रोडवरून वैजापूरच्या (Vaijapur) दिशेने येत असताना फुलंब्रीहून कोपरगावच्या (Kopargav) दिशेने जात असलेल्या क्रुझरशी धडक झाली या अपघातात लक्ष्मीबाई बाबुराव पाथरे, शिवनाथ चंपत जाधव, राणीबाई भानुदास शेरकर, शिवनाथ भीमराव पाथरे, भीमराव पाथरे, असे जखमींची नावे आहे.

तर अन्य दोघे गंभीर असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारा करता हलवण्यात आले आहे. या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलिसांत (Vaijapur Police) घटनेची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या