Friday, April 25, 2025
HomeनगरInternational Women’s Day 2025: सीएसएमटी-साईनगर वंदे भारतचे सारथ्य महिलांच्या हाती

International Women’s Day 2025: सीएसएमटी-साईनगर वंदे भारतचे सारथ्य महिलांच्या हाती

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Women’s Day)औचित्याने मध्य रेल्वेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्रथमच वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) पूर्णपणे महिलांच्या संचलनाखाली धावली. सीएसएमटी- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस (CSMT- Sainagar Shirdi Vande Bharat Express) ही संपूर्ण महिला कर्मचार्‍यांच्या नेतृत्वाखाली चालवण्यात आली. शनिवारी सकाळी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी ही वंदे भारत एक्सप्रेस निघाली तेव्हा तिची पुर्ण कमान महिला कर्मचार्‍यांनी सांभाळली. यामध्ये महिला लोको पायलट (Women Loco Pilot), असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, टीसी आणि ट्रेन होस्टेस हे सर्व महिला कर्मचारी (Woman Employees) आहेत.

- Advertisement -

पहिल्यांदाच, वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणे महिला क्रूद्वारे चालवली गेली आहे. आज महिला दिनानिमित्त सीएसएमटी येथून निघालेला ट्रेन क्रमांक 22223 सीएसएमटी- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस (CSMT- Sainagar Shirdi Vande Bharat Express) शिर्डी स्थानकावर पोहचल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत या महीलांचे स्वागत करण्यात आलं आहे. वंदे भारत एक्सप्रेस शिर्डी स्थानकावर (Shirdi Station) पोहोचल्यानंतर लोकोपायलट सुरेखा यादव यांचा पुष्पहार घालत सन्मान करण्यात आला. इतर महिलांचाही पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिक बग्गीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच स्टेशन मास्तर कार्यालया समोर केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ट्रेनचे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, तिकीट तपासनीस तसेच ऑन-बोर्ड केटरिंग स्टाफ हे सर्व महिला कर्मचारी होत्या. प्रवाशांनीही या ऐतिहासिक ट्रेनचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि महिलांच्या या भूमिकेचे अभिनंदन केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...