Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधवरदानच शाप?

वरदानच शाप?

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील नामांकित संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, एजीआयच्या आगमनाने मानवतेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. ही एक अशी प्रणाली आहे जी नैसर्गिक बुद्धीच्या पुढे जाऊ शकते. पृथ्वीवरील माणसाला ती पर्याय देऊ शकते. एआयजी प्रणालीच्या बाबतीत एक महत्वाची बाब अशी की, स्वतःला प्रशिक्षित करू शकते आणि मनुष्याच्या तुलनेत अधिक हुशार आहे. इतकी की अनियंत्रित झाल्यास ती बंद करणे अशक्य होऊन जाईल.

यंत्र किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाची जागा घेऊ शकेल का? या एका प्रश्नावर बरीच वर्षे चर्चा सुरू आहे. याच यंत्राने सध्या आपल्यासमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. हे आव्हान मानवतेसमोर मोठी समस्या निर्माण करू शकते.

हे आव्हान आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहे. या माध्यमातून गुगल मानवी स्तरावरील माहिती मिळवण्याच्या खूप जवळ पोहोचले आहे. गुगलने यासाठी एका डीप माइंडचा आविष्कार केला आहे. त्याला एआयजी असे नाव देण्यात आले आहे. हे डीप माइंड मानवी बुद्धीला पर्याय बनू शकेल अशा रीतीने पुढे आणले जात आहे. ‘द नेक्स्ट वेब’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात असा दावा करण्यात आला आहे की, मनुष्य कधीही आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स प्राप्त करू शकणार नाही. परंतु हा दावा चुकीचा निघाला, कारण डीप माइंडच्या संशोधन संचालकाने लिहिले, द गेम इज ओव्हर! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील नामांकित संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, एजीआयच्या आगमनाने मानवतेचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. निक बोस्ट्रोम यांनी असा अंदाज लावला आहे की, ही एक अशी प्रणाली आहे जी नैसर्गिक बुद्धीच्या पुढे जाऊ शकते. पृथ्वीवरील माणसाला ती पर्याय देऊ शकते. एआयजी प्रणालीच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब अशी की, स्वतःला प्रशिक्षित करू शकते आणि मनुष्याच्या तुलनेत अधिक हुशार आहे. इतकी की, अनियंत्रित झाल्यास ती बंद करणे अशक्य होऊन जाईल. ही कृत्रिम वस्तू हाडामासाच्या माणसाप्रमाणे व्यवहार करू लागली आहे. जर यांत्रिक मेंदू माणसासारखाच चालू लागला तर त्याला चुकीचा विचार करण्यापासून कोण रोखू शकेल?

- Advertisement -

जगातील सर्व बड्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून करत आहेत. यात गुगलचाही प्रामुख्याने समावेश आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी गुगलच्या डीप माईंड एआय डिव्हिजनचे प्रमुख संशोधक डॉ. नंदो डी. फ्रिटास यांनी सांगितले की, कृत्रिम सामान्य बुद्धीचा (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजेच एजीआय) अनुभव घेण्यासाठी अनेक दशकांपासून सुरू असलेले संशोधन पूर्ण झाले आहे. डीप माइंडने एक अशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टिम तयार केली आहे, जी गोष्टींचे वर्गीकरण करण्याव्यतिरिक्त फोटो पाहून त्याला कॅप्शन देणे, चॅटिंग करणे, व्हिडिओ गेम खेळण्यापासून भावपूर्ण कविता लिहिण्यापर्यंत सर्व काही करू शकते. डीप माइंडच्या या यंत्राला गॅटो एआय असे नाव देण्यात आले आहे.

गॅटो प्रणाली 604 प्रकारची कामे करण्यास सक्षम आहे. एवढेच नव्हे तर गुगलच्या म्हणण्यानुसार, यातील 450 कामे करण्यात ती माणसाला पराभूत करू शकते. गॅटोची सर्वात मोठी ताकद अशी आहे की, यंत्राला जे शिकवले जाईल ते यंत्र कधीही विसरत नाही. आता अगदी ताज्या घडामोडी पाहा- गुगलच्याच एका इंजिनिअरने खुलासा केला आहे की, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ज्या मशिनवर काम करत आहे ते अगदी माणसासारखे झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारा अभियंता ब्लेक लेमोईन यांचा हा खुलासा एखाद्या भीतीदायक सायन्स फिक्शनसारखाच आहे. वास्तविक ब्लेक हे एका चॅट बॉटवर काम करत होते. बॉट हा असा सॉफ्टवेअर प्रोग्राम असतो ज्याला काही विशिष्ट कामे करण्यासाठी तयार केले जाते. बॉट स्वयंचलित असतात आणि सामान्यतः मानवी युजरच्या वर्तनाचे अनुकरण करतात. परंतु त्यांना जेवढे फीड केले जाते तेवढेच काम ते करतात. आता गुगलच्या चॅट बॉटबाबत ब्लेक यांनी खुलासा केला आहे. आपली मर्यादा ओलांडून हा बॉट बराचसा मानवी व्यवहार करू लागला आहे. हा यांत्रिक मेंदू हुबेहूब मानवी प्रतिक्रिया दर्शवू लागला आहे. त्याने ही बाब सार्वजनिक केली तेव्हा त्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.

ब्लेक लेमोईन यांनी सांगितले की, त्यांनी इंटरफेस लामडाबरोबर (लँग्वेज मॉडेल फॉर डायलॉग अ‍ॅप्लिकेशन) संवाद करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना असा अनुभव आला, जणू आपण एखाद्या मानवाशीच गप्पा मारत आहोत. गुगलने मागील वर्षी लामडा हे कॉन्वर्सेशन टेक्नॉलॉजीमधील आपले एक मोठे यश असल्याचे सांगितले होते. आता गुगलच्या अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार हे मशीन मानवी आवाजात मानवाबरोबर तासन्तास बातचीत करण्यास सक्षम आहे. म्हणजेच आपण एखाद्या माणसाबरोबर जसे विषय बदलून अनेक तास बोलतो तसेच त्याच्याशी बोलू शकतो. हे संभाषण पूर्णपणे तार्किक असेल. ब्लेक लोमेईन हे इंजिनिअर आहेत. चॅटबॉटसोबत आलेला अनुभव त्यांनी एका वेबसाईटवर लिहिला. लामडाबरोबर धर्म, चेतना आणि रोबोटिक्सच्या नियमांविषयी आपण चॅटबॉटबरोबर बातचित केली आणि लामडाने स्वतःला एक संवेदनशील व्यक्ती म्हणून सिद्ध केले. स्वतःला मशीन म्हणून नव्हे तर गुगलचा एक कर्मचारी म्हणून स्वीकारले जावे, अशी इच्छाही लामडाने व्यक्त केली आहे. ब्लेक यांनी सांगितले की, गुगलमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांसमक्ष त्यांनी लामडाच्या मानवी भावना सांगितल्या तेव्हा त्यांचे म्हणणे दुर्लक्षित करण्यात आले. गुगलने अभियंत्याचे म्हणणे नाकारले असले तरी एखाद्या रोबोने माणसासारखा विचार करण्यास आणि बातचीत करण्यास सुरुवात करणे याचा अर्थ पाणी बरेच पुढे गेले आहे आणि ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही.

एक तिसरी घडामोड अशी आहे की, शास्त्रज्ञ कृत्रिम बुद्धिमत्ता बनवण्यात यशस्वी झालेले असतानाच कृत्रिम शरीरही विकसित केले जात आहे. संशोधकांनी अशी त्वचा तयार केली आहे जी मानवी त्वचेसारखीच संवेदनशील असेल आणि ती रोबोला लावल्यानंतर त्याला स्पर्श करताच तो मानवी संवेदनांचीच अनुभूती घेऊ शकेल. तो माणसासारख्याच प्रतिक्रिया देईल. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी ही त्वचा एका हायड्रोजेलद्वारे तयार केली आहे. हायड्रोजेलच्या आत सेन्सर असतील. त्यामुळे आपल्या आसपास काय आहे, याचा शोध घेणे रोबोटला शक्य होईल. ही त्वचा आता अधिक शक्तिशाली रोबोटला देण्याचा विचार सुरू आहे, ज्यामुळे तो अधिक बुद्धिमान होईल. सोशल रोबोटिक्समधील तज्ज्ञांच्या मते, येणार्‍या दशकात रोबोट लोकांच्या सामाजिक आणि लैंगिक जीवनाशी एकरूप झालेले असतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील आघाडीच्या संशोधकांच्या मते, एजीआय तंत्रज्ञानाचे आगमन मानवजातीच्या अस्तित्वासाठीच धोकादायक असेल. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. निक बोस्ट्रोम यांच्या अंदाजानुसार हे तंत्रज्ञान मानवाच्या जैविक बुद्धीच्याही पुढे जाईल. पृथ्वीवर माणसाला पर्याय देऊ शकेल. एजीआय तंत्रज्ञानाविषयीची प्रमुख चिंता अशी आहे की, ही प्रणाली स्वतःला शिक्षण-प्रशिक्षण देण्यास सक्षम आहे. ही प्रणाली इतकी हुशार आहे की, अनियंत्रित झाल्यास तिच्यावर नियंत्रण करणे, ती बंद करणे अशक्य होऊन बसेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या