Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाCWG 2022: पी व्ही सिंधूची ‘सुवर्ण’भरारी, भारताची पदकसंख्या ५६ वर

CWG 2022: पी व्ही सिंधूची ‘सुवर्ण’भरारी, भारताची पदकसंख्या ५६ वर

दिल्ली | Delhi

बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूने इतिहास रचला आहे. बॅडमिंटनमधील महिला एकेरीचा अंतिम सामन्यात भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेल लीशी झाला.

- Advertisement -

पीव्ही सिंधूने महिला एकेरीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल लीचा २१-१५, २१-१३ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. सिंधूच्या विजयानंतर देशाच्या क्रीडा क्षेेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सिंधूचे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी, २०१४ मध्ये ग्लासगो येथे आणि २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धांमध्ये तिने अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक पटकावले होते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे भारताचं १९ वं सुवर्णपदक आहे. तर, भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ५६ पदकं जिंकली आहेत. ज्यात १५ रौप्यपदक आणि २२ कांस्यपदकांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या