Thursday, September 19, 2024
Homeक्राईमNashik Crime News : 'प्रिपेड टास्क' देऊन ६५ लाख उकळले; शहरातील ११...

Nashik Crime News : ‘प्रिपेड टास्क’ देऊन ६५ लाख उकळले; शहरातील ११ बिल्डर, नोकरदारांची एकाच पद्धतीने फसवणूक

नाशिक। प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

पार्टटाईम जॉबमध्ये ( Part Time JOb) प्रीपेड टास्कचे अमिष दाखवून सायबर भामट्यांनी एकूण अकरा बिल्डर, व्यावसायिक व नोकरदारांना तब्बल ६५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. पैशांचा परतावा मिळाला नसल्याने संबंधित तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाणे (Cyber Police Station) गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज मगन धामणे (रा. नवश्या हाईटस्, कर्मयोगी नगर, नाशिक) हे बांधकाम व्यावसायिक असून ते व इतर दहा व्यावसायिक, नोकरदार हे नियमित कामकाज करत असतांना सर्वांना १३ जानेवारी २०२३ ते १४ मार्च २०२४ या कालावधीत त्यांच्या व्हाट्सअॅप, टेलिग्राम आयडीवर अनोळखी संशयितांनी वेगवेगळ्या मोबाईल (Mobail) नंबरसह आयडींवरुन पार्ट टाईम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’ च्या स्कीम लाॅन्च केल्या. यात कमीत कमी कालावधीत घरबसल्या जादा पैशाचे प्रलोभन दाखविले.

त्यानंतर धामणेंसह इतर दहा तक्रारदारांनी अधिकचे पैसे मिळतील, या अमिषाने आर्थिक गुंतवणूक करण्यास तयारी दर्शविली. यात सायबर चोरट्यांनी अकरा तक्रारदारांना स्कीमनुसार कमी जोखमीचे टास्क दिले. ते पूर्ण केल्याने अनेक तक्रारदारांच्या बँक खात्यात संशयितांकडून २००, ५०० व १००० रुपयांचा परतावा ‘क्रेडिट’ झाला. त्यामुळे तक्रारदारांचा विश्वास बसला आणि त्यांनी अधिकची गुंतवणूक (investment) केली.

असे दिले टास्क अन् झाली फसवणूक

संशयितांनी तक्रारदारांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या अॅप व लिंकवर क्लिक करण्यासह खासगी कंपन्यांचे रिव्ह्यूव्ह आणि रेटींगचे गुण देण्याचे टास्क दिले. ते स्विकारल्यावर पूर्ण होताच काही रक्कम तक्रारदारांना दिली. यानंतर कमी किंवा अधिकची आर्थिक गुंतवणूक केल्यास ते टास्क पूर्ण केल्यावर जास्तीचा परतावा देण्याचे अमिष दाखविले. त्यात अनेकांनी आपल्याकडील २०, लाख, १५ लाख, दहा लाख, पाच लाख व तत्सम रक्कम गुंतविली. मात्र, यातच सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना वेगवेगळी आश्वासने देत, टास्क पूर्ण करा, दुप्पट, तिप्पट परतावा एकत्रित मिळेल, असे सांगून अकरा तक्रारदारांचे ६५ लाख ६५ हजार ८८१ रुपये उकळून फसवणूक केली.

फसवणूकीची पद्धत एकसारखीच आहे. मात्र, संशयितांचे संपर्क नंबर वेगवेगळे आहेत. तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरु असून नागरिकांनी गंभीर स्वरुपाची फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी लिंकवर क्लिक करु नये. पार्ट टाईमच जॉबची चॅटिंग, इन्व्हिटेशन स्कीप करावे. अधिक सतर्क राहण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यातून माहिती घ्यावी.

रियाज शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर
- Advertisment -

ताज्या बातम्या