Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे| प्रतिनिधी Pune

- Advertisement -

लोणावळा परिसरातील व्हिला व गेस्ट हाऊसमध्ये थांबून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

मोनिल अतुलकुमार मोदी (वय २४ वर्षे रा. मेहसाणा, गुजरात), रवि गोकल प्रसाद जाट (वय २१ वर्षे, रा. जिल्हा राजगड राज्य- मध्यप्रदेश),
रुद्रपाल सिंग गजेंद्रसिंग चौहान( वय २२ वर्षे, रा जि खाडवा राज्य मध्यप्रदेश), हंश कैलास वर्मा (वय १९ वर्षे रा. बोरीवली ईस्ट मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ९७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. फसवणुकीतील १८ लाख रुपये पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

या गुन्ह्यातील आरोपींनी येस बँकेतील एका करंट अकाउंटमध्ये ८ लाख २५ हजार रुपये जमा करून घेतल्याचे तपासात उघड झाले. संबंधित खाते ‘वेल्टोरा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने उघडण्यात आले होते. या खात्याचा धारक मोनिल अतुलकुमार मोदी हा सतत वेगवेगळ्या राज्यांत फिरत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते.

आरोपी लोणावळ्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले.

४०० ते ५०० व्हिलांमध्ये शोधमोहीम
लोणावळ्यातील सुमारे ४०० ते ५०० व्हिलांमध्ये शोधमोहीम राबवून अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत आणखी तीन जण आढळले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून लॅपटॉप, ७ मोबाईल, १४ डेबिट कार्ड, वेब कॅमेरे, बँक अकाउंट किट आणि रबरी स्टॅम्प असा मुद्देमाल जप्त केला.

एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम बँक खात्यात जमा
तपासादरम्यान आरोपी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यात सायबर फसवणुकीची रक्कम वर्ग करत असल्याचे समोर आले. या खात्यात एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी विविध बँकांमध्ये अनेक करंट अकाउंट उघडून देशभरात अशाच प्रकारे फसवणूक केल्याची कबुली दिली.

या टोळीवर हाँगकाँगमधून वेब कॅमेऱ्याद्वारे नियंत्रण ठेवले जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना यूएसडीटी या क्रिप्टोकरन्सीद्वारे मोबदला दिला जात होता. सर्व आरोपी सुशिक्षित असून त्यांना बनावट नोकरीचे आमिष दाखवून या गुन्ह्यात ओढले गेले होते.ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

बिचुकले

Baramati ByPoll Election 2026: बारामतीत बिचुकले, करुणा शर्मांच्या एकुण मतांपेक्षा ‘नोटा’...

0
बारामती | Baramatiदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे....