Sunday, September 15, 2024
Homeमहाराष्ट्रनोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून महिलेची 12 लाखांची फसवणूक

नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून महिलेची 12 लाखांची फसवणूक

पुणे | प्रतिनिधि | Pune

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे बेरोजगरीची मोठी समस्या निर्माण झाली असताना नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे मोठी आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. अशाच प्रकारे पुण्यातील हडपसर भागातील एका महिलेला नामांकित कंपनीचे आमिष दाखवून तीची 12 लाखाची फसवणूक सायबर चोरट्यांनी केली आहे.

एका महिलेला नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल ११ लाख ९९ हजार ६११ रुपये भरायला भाग पाडले. याप्रकरणी मगरपट्टा येथील ४३ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला सध्या एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. तिला आणखी चांगली नोकरी हवी असल्याने तिने नोकरी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. तिला २१ मे रोजी फोन आला़ रिक्रुटमेंट इन डिड या रिक्रुटमेंट एजन्सीमधून बोलत असल्याचे भासविले. तिला नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या