Friday, June 14, 2024
Homeनाशिकसायकल राजधानीत चोरट्यांचा सायकलींवर डल्ला

सायकल राजधानीत चोरट्यांचा सायकलींवर डल्ला

नाशिक| Nashik

- Advertisement -

सायकलींचे दुकान फोडून चोरट्यांनी ६८ हजार रूपये किंमतीच्या सायकली चोरून नेल्याचा प्रकार नाशिकरोड परिसरात गुरूवारी (दि.१३) उघडकीस आला.

नसिर रहिमखान पठाण (४२, रा. स्टेशनरोड, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी बलविंदरसिंग परमजितसिंग लांबा (रा. सिंग हाऊस, गुरूद्वाराजवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार लांबा यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील न्यु सिंग सायकल दुकान आहे. गुरूवारी पहाटे संशयित व त्याच्या सोबत असलेल्या दोन जोडीदारांनी सायकल दुकानाच्या शटरची पट्टी वाकवून दुकानातील १२ नव्या सायकली व जुन्या अशा एकुण ६८ हजार रूपयांच्या सायकली चोरून नेल्या. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत सायकलिंग वाढले आहेत. अनोख्या धाटनीच्या सायकली घेण्याकडे नागरिकांचा कल आहे. अशातच चोरट्यांचे फावल्यामुळे भीतीचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या