दिल्ली | Delhi
बंगालच्या उपसागरात आलेल्या मोखा चक्रीवादळाने बांगलादेश आणि म्यानमारमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेकडो घरं पडली असून किनारी भागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
चक्रीवादळामुळं म्यानमारमध्ये आतापर्यंत तब्बल ८१ लोकांचा मृत्यू झाला असून मदत व बचावकार्य जारी आहे. वादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळत असून पाणी किनारपट्टीवरील गावात घुसल्याने अडकून पडलेल्या सुमारे एक हजार जणांना आज वाचविण्यात आले. मोचा वादळाने बांगलादेशच्या किनारी भागातही नुकसान केले आहे.
गौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO
म्यानमारमधील सिटवे गावात उंचावर असलेले बौद्ध मठ, शाळा आणि इतर भक्कम इमारतींमध्ये सुमारे वीस हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. मात्र तरीही वेगवान वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे त्यांच्यापैकी ७०० जण जखमी झाले आहेत. म्यानमारमधील राखीन प्रांतातील दहा सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरले आहे.
राखीन भागात रोहिंग्या मुस्लिमांची वस्ती अधिक असल्याने याभागाकडे येथील लष्करशाहीचेही दुर्लक्ष आहे. मोचा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी जोरदार वारे आणि पाऊस यांचा जोर कायम असल्याचे प्रशासनाने सांगितले. म्यानमारमध्ये वादळाशी निगडित विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. बांगलादेशच्या किनारी भागातही वादळामुळे वित्त हानी झाली आहे.
NIA ची मोठी कारवाई, देशातील ६ राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी
मोचा हे एका दशकाहून अधिक काळ या प्रदेशात धडकणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ होते, ज्याने अनेक गावं उद्ध्वस्त केलं, झाडे उन्मळून पडली आणि रखाइन राज्याच्या बहुतांश भागातील दळणवळण खंडीत केले. याशिवाय सरकारी माध्यमांनी तपशील न देता सोमवारी पाच मृत्यूची माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.